Ticker

6/recent/ticker-posts

वरुड येथे ,हस्तकौशल्य व पाककृती कार्यशाळा संपन्न-

मंगरूळपीर-मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक  मंडळ, कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाअंतर्गत  दत्तक ग्राम वरुड येथील नवयुती व महिलांकरिता दोन दिवसीय हस्तकौशल्य व पाककृती कार्यशाळेचे आयोजन दि. 24 व 25 मार्च 2022 रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे करण्यात आली .कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा. दिव्या गावंडे प्रमुख अतिथी रजनी  सोनोने अंगणवाडी सेविका व शोभाताई गावंडे आणि समन्वयक प्रा. सौ.एस.एस. जाजू उपस्थित होते.
प्रथम सत्रात सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा.सौ. जाजू यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक व उद्देश स्पष्ट केले तसेच रजनी सोनवणे मॅडम यांनी  कार्यशाळेत मार्गदर्शन केले आणि अध्यक्ष प्रा. दिव्या गावंडे यांनी मार्गदर्शन आणि कार्यशाळेची कौतुक केले.
द्वितीय सत्रात बी.ए. भाग 1 च्या विद्यार्थिनींनी लोकर चा कळस, डॉल, तोरण, मायक्रॉनचा आरसा, झोपाळा, नॅपकीन होल्डर, मॅक्झिन होल्डर ,की होल्डर , झिंगलबेल, झुंबर , कचर्यातून कला ,शुष्क पुष्परचना इत्यादी प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यात ईश्वरी चौधरी, ललिता निंबेकर, सानिका आखाडे ,साक्षी भगत, वैष्णवी राऊत, वैष्णवी ठाकरे ,प्रज्ञा चुंबळे ,सोनम शृंगारे ,राणी जमनीके, अश्विनी तायडे, प्रलय घोडे, मायावती मनवर, अंजली बोंबले ,सुप्रिया भगत, अंजली मनवर, प्रिया राऊत, प्राची  भड व साक्षी ढोले इत्यादी विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष करून दाखविले.  कार्यशाळेत 35 नवयुती व महिलांनी याचा लाभ घेतला.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन नीता देवळे यांनी तर आभार प्रदर्शन राणी जामनिके यांनी मानले.
दुसऱ्या दिवशी दिनांक 25-03-2022 रोजी *पाककृति कार्यशाळेचे* आयोजन केले .या कार्यशाळेचे अध्यक्ष सौ शितल ताई गावंडे ,प्रमुख अतिथी सौ ताई बाई गावंडे ,समन्वयक  प्रा. सौ एस. एस .जाजू  मंचकावर उपस्थित होते. मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रतिमापूजन करून सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यात बी.ए .भाग 2 व 3 च्या विद्यार्थिनींनी मिल्क कस्टर्ड, मंचुरियन, आलू समोसा रोल ,सांभार वडी ,पोहा वडी, मॅगी मंचुरियन ,दाबेली, आलू भटिंडा इत्यादी डिश प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यात नीता देवळे, रेश्मा गारवे, ज्ञानेश्वरी डुकरे, संजीवनी डाखोरे, प्राची भड, साक्षी ढोले ,मोहना पंडित, नेहा राऊत, मयुरी कांबळे, प्रगती पाकधने,वैष्णवी घोडे,शीतल सूर्वे, कल्याणी गावंडे ,शुभांगी राऊत, प्रिया शिंदे, भाग्यश्री राऊत ,सोनल साखरकर, प्रियंका ठाकरे ,स्नेहल वार्डेकर ,दीक्षा सोनोन, शिवानी टोनचर, वैष्णवी चौधरी, मयुरी राठोड, दीक्षा शृंगारे, पूजा शृंगारे, गायत्री भगत, आचल इंगळे इत्यादी विद्यार्थीनींनी प्रत्यक्ष  बनून दाखविले. कार्यशाळेचे उत्कृष्ट संचालन कल्याणी गावंडे यांनी तर आभार प्रदर्शन दीक्षा सोनवणे यांनी मानले व कार्यशाळे करिता श्री. राठोड सर , रुपाली गायकवाड अंगणवाडी सेविका यांनी शुभेच्छा दिल्या व कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
ही कार्यशाळा संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात प्रा.एस . एस.जाजू यांनी आयोजित केली व यशस्वी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये जवळपास 35 ते 40 नवयुती व महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला . सर्वांनी या पाककृतीचे आस्वाद घेतले व कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
समन्वयक-
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
प्रा.सौ. एस. एस. जाजू 
यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय ,मंगरूळपीर ,
जि. वाशिम

Post a Comment

0 Comments