Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाची तिसरी लाट ओसरली : प्रशासनाकडून लसीकरणावर भर दहा दिवसांत १२ ते १४ वयोगटातील १० टक्के मुलांनी घेतली कोरोना लस!

 

वाशिम : कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. चौथ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असल्याने १२-१४ वयोगटातील मुला-मुलींसाठी १७ मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, मुलांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर येत आहे. दहा दिवसात ६ हजार मुलांनी लस घेतली असून याची टक्केवारी १० अशी येते.

कोरोनापासून बचाव म्हणून १२

कोरोना महामारीचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १७ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यास प्रारंभ झाला. कोरोनाच्या तिन्ही लाटांत १८ वर्षांआतील मुला-मुलींना फारसा धोका नव्हता. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, वर्षांनंतरच्या मुला-मुलींनादेखील प्रतिबंधात्मक लसीचा डोस दिला जात आहे. १२ ते १४ या वयोगटातील मुला मुलींना कोर्बेव्हॅक्स या लसीचा डोस देण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून, या लसीचा २८ दिवसांच्या फरकाने दुसरा डोस देण्यात येणार आहे. शाळा स्तरावरदेखील
लसीकरण शिबिर घेण्यात येत
आहेत. या लसीकरण मोहिमेला
अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे
दिसून येते.वयोगटातील मुला-मुलींनादेखील

कोणताही गैरसमज न बाळगता, अफवांवर विश्वास न ठेवता १२ ते १४ लसीचा डोस घ्यावा, याबाबत जनजागृतीदेखील करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध असून, पालकांनी १२ ते १४ वयोगटातील लस द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोनापासून बचाव म्हणून १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींनादेखील कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. कोणत्याही
अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी १२ वर्षावरील पाल्याला लसींचा डोस द्यावा. - डॉ. सुहास कोरे जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

- डॉ. तेजल जोशी-गायकवाड बालरोग तज्ज्ञ वाशिम
लसीकरणासंदर्भात विशेषत: ग्रामीण भागात अफवा, गैरसमज असतात. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने मुलांना अवश्य लस द्यावी.

लस ही पुर्णतः सुरक्षित असून, कोरोना विषाणू होऊ नये अथवा लक्षणे "सौम्य राहावी म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीचा डोस देऊन १२ ते १४ वयोगटातील मुलांना सुरक्षित ठेवावे.
- डॉ. प्रवीण वानखडे •बालरोग तज्ज्ञ, वाशिम



Post a Comment

0 Comments