Ticker

6/recent/ticker-posts

तर तळ्याच्या काठावर बसून आंदोलन करुअनसिंग येथील बेघर कुटुंबातील महिलांचा प्रशासनाला इशाराआवास योजनेत प्राधान्य यादीमध्ये लाभ देण्याची मागणी


वाशिम - तालुक्यातील ग्राम अनसिंग येथे शासनाच्या अतिक्रमित जागेवर घरे बांधुन संसार करणार्‍या अनुसुचित जातीच्या महिलांची पक्की घरे वर्ष २०१२ मध्ये उध्दवस्त करुन त्यांना स्वत:च्या घरातुन निष्कासित करण्यात आले होते. या महिलांना प्राधान्यक्रमाने घरकुलाचा लाभ द्यावा अन्यथा तळ्याच्या काठावर बसून आंदोलन करु असा इशारा या महिलांनी प्रशासनाला दिला आहे. यासंबंधी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने सौ. पंचफुला गायकवाड यांच्या नेतृत्वात शुक्रवार, ४ मार्च रोजी गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
    निवेदनात नमूद आहे की, तालुक्यातील मौजे अनसिंग येथे २०१२ मध्ये शासकीय अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली येथील अनुसुचित जातीच्या लोकांची पक्की घरे पाडून त्यांचा संसार उघडण्यावर आणण्यात आला. तेव्हापासून महिला घरकुलासाठी प्रशासनाची झगडत आहेत. आता प्रधानमंत्री आवास योजनेची कार्यवाही अनसिंगमध्ये सुरु असून शक्ती प्रदत्त समितीच्या वतीने पात्र अपात्र लाभार्थ्याची यादी तपासणे सुरु आहे. त्यानुसार घरकुलाच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत प्रथम आमचे नाव घ्यावे या मागणीसाठी या महिलांनी अनेकवेळा शक्ती प्रदत्त समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु या प्रस्तावावर प्रशासनाकडुन सकारात्मक कार्यवाही झाली नसल्यामुळे या महिला शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वासाठी घरे - २०२२ या धोरणानुसार निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करुन या लाभार्थ्यांना पक्की घरकुले मिळणे आवश्यक आहे. वर्ष २०१२ मध्ये अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली बेघर झालेल्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र यादीमध्ये प्रथम प्राधान्याने लाभ देवुन प्रशासनाने त्यांचा उघड्यावरील संसार सावरावा. अन्यथा सात दिवसानंतर अनसिंग येथील तळ्याच्या काठावर बसून लाभार्थी महिला आंदोलन करतील असा इशारा निेवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदन देतांना मानवी हक्क सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई जगदीशकुमार इंगळे, सरचिटणीस अल्ताफ घनकर, नंदु काठोळे यांच्यासह पंचफुला गायकवाड, श्रीमती अनिता ठोके, बबन कुबडे, महादेव राजगुरु, सौ. गिता बागुल, अंबादास कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments