Ticker

6/recent/ticker-posts

स्मशानभूमीच्या रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी , सरण रचून आम्हाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करून तेरवी १३ दिवस स्मशान भूमीत शासनाचा निषेध करणार


मंगरुळपीर ता ३०/
 येथील प्रभाग क्रमांक १ मधील हिंदू स्मशानभूमीच्या रस्ता कामात भ्रष्टाचार व गैरप्रकार होत असल्याने याची चौकशी करण्यात यावी अन्यथा स्मशान भूमीमध्ये गांधीगिरी स्वरुपात आदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नगरसेवक अनिल गावंडे व सौ ज्योतिताई लवटे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
 निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषद मंगरूळपीर प्रभाग क्र . १ मध्ये मुख्य मंत्री सडक योजना निधीचे माध्यमातून खडीकरण व डांबरीकरण काम सुरु आहे या बाबत आम्ही नगर सेवकांनी सर्दहू काम हे अत्यत निकृष्ट दर्जाचे होत असल्या बाबत अनेक वेळा जिल्हाधिकारी , प्रशासक, न. प. मुख्याधिकारी , याच्या कडे लेखी स्वरुपात तक्ररी केल्या आहेत. परंतु जिल्हाधिकारी मुख्य प्रशासक , मुख्य अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही. कामाची चौकशी करून न्याय देणे अपेक्षित असतांना स्थानिक प्रशासन न्याय देऊ शकले नाही कारण कि यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैर प्रकार झाले आहे . या कामामध्ये ठेकेदार यांनी कारंजा रोड ते स्मशानभूमी चे काम रस्ते कामात माती व रस्त्यावरील निघालेली माती टाकली आहे . त्यामुळे नियोजित रस्ता  पावसाळ्यात खचून जाणार आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता असल्याचे नागरिकात बोलले जात आहे .या कामाची त्रि सद्स्यीय समिती मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे . स्थानिक प्रशासन मुख्यमंत्री रस्ता अनुदानातून कामाची चौकशी करण्यास नकार देत आहे. कारण अर्ध्या तुम्ही अर्ध्यात आम्ही कमिशन वाटप झाले असल्याची चर्चा नागरिकात जोर धरत आहे .म्हणून आम्ही गुढीपाडव्या पासून स्मशान भूमीत गांधी गिरी मार्गाने स्थानिक प्रशासनाचे विरोधात प्रतीकात्मत स्वरूपात सरण रचून आम्हाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करून तेरवी म्हणून १३ दिवस स्मशान भूमीत शासनाचा निषेध करणार आहोत . त्यामुळे सर्दहू कामाची त्रि सदस्यीय समितीमार्फत चौकशी करून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments