Ticker

6/recent/ticker-posts

शासनाने कलावंताच्या मानधनात वाढ करावी. - संजय कडोळे .

   वाशिम : शासकिय कर्मचाऱ्या करिता दर दहा वर्षानी, वेतन आयोग, वेतन वाढ करते . शिवाय वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी आणि जुलै महिन्यात त्यांना महागाई भत्ता वाढविला जातो . शिवाय सेवानिवृत्तीनंतर, निवृत्ती वेतन ( पेन्शन ) आणि दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढविल्या जातो . आमदार खासदाराचे पगार, भत्ते लाखोच्या घरात देय केले जातात .                  .                  .                         . परंतु साहित्यीक आणि लोककलावंत हे दिवस रात्र, समाजप्रबोधन व राष्ट्रीय जनजागृती करून लोकांमध्ये सदैव जागरूकता निर्माण करतात त्यांना मात्र तुटपुंजे मानधन दिले जाते . कलावंताच्या मानधनापेक्षा जास्त तर कर्मचाऱ्यांना धुलाई भत्ता दिल्या जातो . मात्र शासन याचा विचार करीत नाही .                       .                 .                . शासनाने निदान वाढत्या महागाईला अनुसरून १ ) सर्व मानधन लाभार्थी कलावंताचे कमितकमी मानधन दरमहा दहा हजार रुपये करावे . २) वर्षातून दोनदा महागाईचा विचार करून मानधनात वाढ करावी . ३) मानधन दरमहा अचूक वेळेवरच लाभाथ्यांच्या खात्यात वळते करावे . इ. मागण्याचे निवेदन, विदर्भ लोककलावंत संघटना, कारंजा [ लाड ] कडून, संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी मा . जिल्हाधिकारी षण्मुखराजन सरांमाफत, मुख्यमंत्री,मा . उद्धवजी ठाकरे,  तथा सांस्कृतिक मंत्री ना . अमित देशमुख यांना दिले असून, "शासनाने आजच्या वाढत्या महागाईच्या सरासरीला अनुसरून, वृद्ध साहित्यीक कलाकाराच्या मानधनाचे निश्चित धोरण ठरविण्याची मागणी केली असून, लवकरात लवकर कमितकमी दरमहा दहा हजार रुपये मानधन अदा करण्याची विनंती केली आहे ."

Post a Comment

0 Comments