नागपूर : राज्यामध्ये उन्हाच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून नागपूरसह संपूर्ण विदर्भ अक्षरशः होरपळून निघतो आहे. नागपूरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच पाऱ्याने ४२ अंशांपर्यंत उच्चांकी झेप घेतली आहे. त्याचवेळी चंद्रपूरची सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद करण्यात आली.प्रादेशिक हवामान विभागाने पाच दिवस विदर्भात येलो अलर्ट दिलेला आहे. त्याचा प्रभाव आज विदर्भात सगळीकडेच तीव्रतेने जाणवला. नागपूरच्या कमाल तापमानात आज आणखी अर्ध्या अंशांची वाढ होऊन पारा ४२.१ अंशांवर गेला.या मोसमातील हे उच्चांकी तापमान ठरले. उन्हाचा सर्वाधिक तडाखा पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला बसतो आहे. येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यासह संपूर्ण देशात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. येथे नोंद झालेले ४४.२ अंश सेल्सिअस तापमान जगात चौथ्या क्रमांकावर राहिले. तशी नोंद ‘अल डोराडो’ या जागतिक हवामान केंद्राच्या संकेतस्थळावर करण्यात आली.म्हणून तीव्र लाटविदर्भातील वर्धा (४२.८ अंश सेल्सिअस), वाशीम (४२.५ ) व यवतमाळ (४२.० ) सह अन्य जिल्ह्यांमध्येही उन्हाचे जोरदार चटके जाणवले. अंगाची लाहीलाही होणारे असह्य ऊन व उकाड्यामुळे विदर्भवासी सध्या कमालीचे त्रस्त आहेत. सूर्यास्तानंतरही उन्हाच्या झळा बसताहेत. हवामान विभागाने येलो अलर्ट लक्षात घेता किमान तीन-चार दिवस तरी उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राजस्थानमधून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे सध्या मध्य भारतासह विदर्भातही उन्हाची तीव्र लाट पसरली आहे.विदर्भातील तापमानजिल्हा तापमानचंद्रपूर ४४.२ अकोला ४३.२ वर्धा ४२.८ वाशीम ४२.५ नागपूर ४२.१ यवतमाळ ४२.० अमरावती ४१.८ ब्रह्मपुरी ४१.८ गोंदिया ४१.५
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments