अमरावतीत राणा दांपत्य आणि पोलीस विभागाचा वाद आता टोकाला पोहचला आहे. आता आमदार रवी राणा यांनी थेट अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांना निलंबित करून तुरूंगात टाकण्याची धमकी दिली आहे.. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची सीमा ओलांडली असून आता सहन होणार नाही. आरती सिंह यांची पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करून ईडी, सीबीआय चौकशी करून तुरूंगात टाकणार असल्याची धमकीच आमदार रवी राणा यांनी दिलीय.
पोलीस आयुक्तांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप
रवी राणा म्हणाले की, "अमरावतीमध्ये आरती सिंह यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. पैसे घेऊन गुन्हेगारांशी सेटलमेंट त्या करत आहेत. या आधी त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केलंय त्या-त्या ठिकाणीही असाच भ्रष्टाचार केला आहे. माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो दाखल करा, त्याला उत्तर मी देईन. अमरावती जिल्ह्यामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे, त्या विरोधात मी पंतप्रधान, गृहमंत्री सर्वोच्च न्यायालय तसेच ईडी किंवा सीबीआयकडे जाईन पण आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच."काही दिवसांपूर्वी अमरावती शहरातील दिल्ली पब्लिक स्कुलच्या प्राचार्यांनी दोन लहान मुलांचे कॅबिनमध्ये केसं कापले आणि एका 6 वर्षीय मुलाला बॅड टच केलं अशी तक्रार पालकानी दिली आणि पोलीसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या प्राचार्याला अटक केली आणि काल रात्री मनपा आयुक्त यांच्यावर शाइफेक प्रकरणी युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांना अटक केली. कालच खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांना नवी दिल्ली येथे 6 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश मिळाले आणि रात्री आमदार रवी राणा यांच्या पार्टीच्या शहर अध्यक्षाला अटक झाल्याने शहरात चर्चेला वाव फुटले आहे.
येत्या काही दिवसात होणार स्पष्ट
यानंतर आमदार रवी राणा यांनी थेट पोलीस आयुक्तांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी हक्कभंग आणून पोलीस आयुक्तांची तक्रार दाखल केली त्यामुळे हा वाद कुठे जाऊन थांबेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण एक महिला अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments