आदर्श ग्राम वनोजा येथिल पंचशील नवयुवक मंडळाचा उपक्रम
प्रतिनिधी:-
सचिन राणे, शेलुबाजार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. त्यांची जयंती ही देशभरात उत्साहात साजरी केली जाते. करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबवून साजरी केली आहे.
गुरुवार १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील आदर्श ग्राम वनोजा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र आदर्श ग्राम वनोजा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पंचशील नवयुवक मंडळाच्या वतीने इतर होणारा अनावश्यक खर्च टाळून जि. प. केंद्र शाळा वनोजा येथे पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना पेन वहीचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात एक वेगळा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे.
यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण संरपंच डॉ. श्रीराम मुखमाले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रमुख पाहुणे, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही व पेन यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गुलाबराव इंगोले, राजूजी भगत, गजानन इंगोले, संदीप इंगोले, नरेंद्र इंगोले, गुणवंत भगत, राहुल इंगोले, संजय इंगोले, स्वप्निल भगत, मधुकर कोकरे , विजय बेलखडे, अमोल इंगोले, तसेच ग्रामपंचायत सदस्य मारुती इंगोले, संजय प्रल्हाद इंगोले, केशव इंगोले, गोवर्धन पाटील, मोहन पानभरे, नंदू गावंडे, रामेश्वर सोलव, जि प. शाळेचे केंद्रप्रमुख दा.दा.गवई, मुख्याध्यापक गजानन वानखडे, शिक्षक अमोल इंगळे, चंदन गावंडे, शिवशंकर धोटे, शितल हिरोळे तसेच दयाराम भगत,बाळकृष्ण इंगोले, सिद्धार्थ खाडे,राष्ट्रपाल इंगोले, धीरज अजाबराव इंगोले, संतोष खोरणे, सचिन राणे (पत्रकार वार्ताहर) तसेच पंचशील नवयुवक मंडळातील सर्व युवक नितीन राजू इंगोले, हरीश गौतम इंगोले,संजय राजू इंगोले, धीरज इंगोले, योगेश भगत, रोशन भगत, रितेश इंगोले, प्रफुल रोकडे, सुबोध भगत, प्रतिक इंगोले, शैलेश इंगोले, भावेश उंदरे सुरज रोकडे, साहिल इंगोले, सुरज इंगोले, मनोज इंगोले, महेश सोनोने अंकुश इंगोले, मनोज इंगोले विशाल भगत, राहुल रोकडे, निक्रोश इंगोले, अमर इंगोले, अनुप खाडे, संकेत खाडे,आदित्य गौतम इंगोले, तसेच पंचशील नवयुवक मंडळातील युवक, व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments