Ticker

6/recent/ticker-posts

लक्झरीवाल्यांची बसस्थानकावर येऊन दादागीरी !

  
कारंजा [ लाड ] : प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्णपणे मिटलेला म्हणजेच समाप्त झालेला असून, एस टी बस वाहतूक व एस टी बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरळीत झालेल्या असल्यामुळे, खाजगी वाहने व लक्झऱ्या यांना प्रवासी मिळेनासे झाले त्यामुळे कारंजा येथील स्थानिक लक्झरी मालक व वाहक चालक प्रवासी मिळत नसल्याने, कारंजा बस स्थानकाच्या शासकिय जागेवरच किंवा गेटवरून आपल्या लक्झऱ्या पलटून नेत आहेत . तसेच बसस्थानकावर एजंट किंवा हॉकर्स  द्वारे आरोळ्या ठोकून, महामंडळाच्या एस टी बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना, कमी भाड्याचे आमिष दाखवीत, खाजगी लक्झऱ्याकडे वळवीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत . त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगार प्रमुखांनी, आर टी ओ आणि शहर पोलिस स्टेशन कडे या खाजगी लक्झरी मालकांविरुद्ध तक्रार दाखल करीत यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून पुढे येत आहे .

Post a Comment

0 Comments