चेहेल येथील श्री हनुमान मंदिराचा गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून जीर्णोद्धार , एक गाव एक गणपती असणाऱ्या या गावची 58 वर्षाची परंपरा वृक्ष देऊन केला लेकी बाईचा सन्मान
विदर्भातून पहिल्यांदा लेकी बाईंना 251 निंबाचे झाड मंदिराच्या कळस रोहन दिनानिमित्त मंगरूळपीर तालुक्यातील चेहेल र्या गावातून भेट देऊन लेकी बाईंचा व जावायांचा सत्कार सोहळा .
चेहेल येथील सर्वधर्मीय ले लेकी बाईंचे कळसा मध्ये योगदान
मंगरूळपीर येथील उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे व त्यांच्या पत्नी सौ. शिवानी ताई मुळे यांच्या हस्ते .हनुमान मंदिराचे पूजन करण्यात आले याप्रसंगी गावकऱ्यांनी दोन्ही मान्यवरांचा शाल श्रीफळ व साडी चोळी आणि गणेश मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला .
गावकर्यांच्या हस्ते वृक्ष व भेटवस्तू देऊन लेकी बाईंचे गुणगौरव करण्याचे आयोजन केल्याबद्दल .याप्रसंगी उपविभागीय अधिकारी बोलताना म्हणाले की लेकी बाईंना भेटवस्तू सोबत दिलेले झाड निश्चितच माहेरची आठवण म्हणून स्मरणात राहील.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी यांच्या पत्नी सौ शिवानी ताई मुळे, चेहेल ग्रामसेविका सौ हर्षा उगले , चेहेल येथील पटवारी देशमुख डॉक्टर दत्तात्रय चौधरी, पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील नागरिक
दि 24,4,2022 पूजेस संध्याकाळी सात वाजता प्रारंभ झाला या पूजेसाठी विधियुक्त पूजा मंगरुळनाथ येथील पप्पू महाराज तिवारी यांनी केली.
दि. 25,4,2022 सोमवार) कळस रोहन सोहळ्यास सोमवारी
रुद्र कलश पूजन, नवग्रह मंडळ पूजन, देवता अभिषेक, शान्तिक पौष्टिक हवन, कुटीर, धान्य दिवस, सायंपूजन हवन, बलिदान, आणि पूर्णाहुतीनंतर महाआरती करण्यात आली.
व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातून मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात आली होती .कलशारोहण, ध्वजारोहण, पिंपळखुटा संगम येथील श्री स्वामी प्रकाश महाराजांच्या हस्ते कलशारोहण, करण्यात आले.
चेहेल गावातील लेकी बाईंचा झाड व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला
नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . कोरोना सारख्या भयानक बिमारी च्या काळात ऑक्सीजन च्या मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत होता व मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी वृक्षतोड झाल्यामुळे कुठेतरी पर्यावरणावर वृक्षलागवड करूनच मात करू शकू या सर्व बाबीचा विचार करून या कार्यक्रमाचे आयोजन चेहेल येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत चौधरी ,दत्ता चौधरी ,आकाश चौधरी, अमोल चौधरी ,गजानन इंगोले, श्रीकृष्णा चौधरी ,विष्णू चौधरी, काशीराम चौधरी, गजानन चौधरी, पंजाब चौधरी, परसराम चौधरी, कैलास चौधरी, बालाराम चौधरी, विनोद चौधरी, किशोर चौधरी, दिलीप चौधरी, प्रमोद चौधरी ,महादेव चौधरी, शेषराव चौधरी केशवराव चौधरी भाऊराव चौधरी, अंबादास चौधरी, निरंजन चौधरी, रमेश चौधरी, शंकर चौधरी, सतीश चौधरी ,मुरलीधर चौधरी , जीवन चौधरी आनंद चौधरी, रघुराम चौधरी, भीमराव सोनवणे, अशोक मनवर ,रामजी पवार, दुधाराम पवार, विठ्ठल राठोड, मोहन राठोड ,गोवर्धन चौधरी मनोज चौधरी मस्त गावकरी मंडळी या कार्यक्रमाचे संचालन प्रदीप चौधरी विजय चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधाकर चौधरी यांनी केले


















0 Comments