Ticker

6/recent/ticker-posts

IPL क्रिकेट सट्टा, मंगरुळपीर येथे रेड, ३० आरोपी विरुध्द पोलिसांची धडक कारवाई

दिनांक :- १३/०४/२०२२
 मा. पोलीस अधिक्षक वाशीम श्री बच्चनसिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्या पासून वाशीम जिल्ह्यातील  अवैध्य धंदयाविरूद धडक मोहीम हाती घेवून वाशीम जिल्हयातील गुंड प्रवृतीचे लोकावर व अवैध्य व्यवसायावर कार्यवाही करून त्यांचा मुक्या आवळल्या व वाशीम जिल्यातील वातावरण भयमुक्त करण्यावर प्राधान्याने भर दिला आहे.
1. पोलीस अधिक्षक वाशीम श्री बच्चनसिंह यांनी जिल्यातील अवैध्य धंदे करण्यारे व अवैयरित्या क्रिकेट साटा चालविणान्या इसमाविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली. त्या मोहीमें अतर्गत दिनांक १२.०४.२०२२ रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती मिळाली की मंगरुळपीर शहरात आय पी एल २०२२ मधील क्रिकेट सटयावर आज दिनांक १२.०४.२०२२ रोजी मंगरुळपीर से कवठळ रोड वरील एका शेतात दोन इसम मोबाईल फोनच्या साह्याने CSK RCB या सामन्यावर लोकांकडून मोबाईल द्वारे क्रिकेट मंच वरील प्रत्येक रन बॉलोग,बॅटींग यावर पैसे लावुन घेवुन हारजीत करीत आहेत. अशा माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले असता नमुद पथकाने दोन पंचाना बोलावून त्यांना मिळालेली माहीती देवून मंगरुळपीर ते कवढळ जाणान्या रोडवरील विशाल पडीकर याचे शेतात जमीनीवर मोटार सायकलचे लाईटचे उजेडात बसुन दोन इसम मोबाईल फोनच्या सहयाने CSK विरूद्ध RCB या सामन्यावर लोकांकडुन मोबाईल द्वारे क्रिकेट मॅच वरील प्रत्येक रन बॉलींग, बॅटींग यावर पैसे लावुन घेवुन हरजीत या जुगार खेळ खेळत असताना आरोपी नामे १) राहुल गालचरण साळुखे, २) जय दयालगिर गिरौ दोन्ही रा. गंगरुळपीर मिळून आले. त्यांचे कडुन आय यो एल क्रिकेट सदया करीता वापरण्यात आलेले ०६ मोबाईल व एक स्कुटी, तसेच नगदी ३६३० असा एकूण ९९.३६० चा माल मिळून आला त्यांचेसोबत सटटा लावण्यात सामिल असलेले एकुण २५ ते ३० फरार आरोपी नामे संतोष लखन देवा, चेतन पाटील, मोहसीन, गोलु तायडे, सर्वा, पियुश, सुजित, आकाश, सोनु, निलेश, स्वप्नील जय टोपण नाव एनटी, जीएम, एसपी. एमआर, एआर, एफ, केबी, एसके, घाँटी, भाऊ, पौवी, टायगर ज्यांचे विरद महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमचे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार असलेल्या आरोपीवर त्यांचा शोध घेऊन अटक करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पोहेका किशोर चिंचोळकर, दिपक सोनवणे पोना अमोल इंगोले, प्रविण राजत, अश्विन जाधव यांनी सहभाग नोंदविला आहे.

Post a Comment

0 Comments