रविवार 29 मे 2022 रोजी घाटकोपर येथे घेण्यात आली . सर्व विषयांनंतर विधवा प्रथा बंदीचा ठराव पास करण्यात आला .याची माहिती राज्यस्तरीय विधवा महिला विकास मंचच्या मिनल अविनाश कुडाळकर सांगलीच्या अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त करताना महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात सर्व महिलांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले
विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला. तो खरोखरच कौतुकास्पद आहे. समाजात स्त्रियांना मान, सन्मान,न्याय मिळण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
उषाताई पोरे यांनी महिला विकास मंच विधवा प्रथा बंदीच्या परिपत्रक वाचून दाखवले व सर्व राज्यांतील महिलांनी आपल्या भागातही असा ठराव पास करून स्रीयांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे जाण्यासाठी विविध संस्था,बचत गट महिला मंडळांनी सहभाग घेऊन ठराव पास करावेत असे आवाहन करण्यात आले. यावेळी राज्यातून मुंबई,ठाणे,पनवेल, कल्याण, घाटकोपर, पुणे, तळा, म्हसळा , सांगली,कोल्हापूर, इचलकरंजी, अलिबाग येथून महिला आल्या होत्या. 65 महिला उपस्थित होत्या. विश्वस्त उषाताई पोरे,हेमाताई खांडके, शैला ताई पाडळकर, संगिता नाझरे,रत्ना उत्तरकर.इत्यादी विश्वस्त हजर होत्या.
महिलांनी या कार्यात सहभागी होण्यास आपली अनुमती दर्शविली.त्याबददल सर्वांचे मनापासून आभार.
या कार्यक्रमाचे नियोजन नामदेव महिला परिषद
अध्यक्षा.आशालता वेल्हाळ आणि उषा मुळे आणि सर्व संयोजकांनी केले.त्या सर्वांचे आभार आणि पुढील नियोजनासाठी खूप खूप शुभेच्छा.
असा ठराव सर्व राज्यस्तरीय सर्व नामदेव शिंपी समाज जातीतील नामदेव शिंपी समाजाने.... विधवा प्रथा बंदीचा ठराव प्रत्येक संस्थेने करून या रुढी परंपरेला मूठमाती देण्यासाठी आपले एक पाऊल प्रयोगांती विचारांचे उचलावे .आणि स्त्री मनाचा विचार करून तिच्या या लढ्यामध्ये सामील व्हावे. असे आवाहन राज्यस्तरीय महिला विकास महामंच अध्यक्ष सौ. मिनल अविनाश कुडाळकर करत आहेत. आमच्या या समाजकार्यात महिला भगिनींना सार्थ साथ देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एक पाऊल प्रगतीचे तुमच्या आमच्या विचारांचे.
सौ. मिनल कुडाळकर राज्यस्तरीय महिला विकास मंच विधवा प्रथा बंदी सांगली जिल्हा अध्यक्ष यांनी परिसरातील महिला भगिनींना आवाहन केले आहे कुठल्याही अडचणीत माझ्या मोबाईल नंबर वर संपर्क करा मो. ९४२३८७२४१६
८९९९६२२००९ राज्यस्तरीय महिला विकास मंच सदैव आपल्या सेवेत
0 Comments