Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम येथे अद्ययावत 'नागरी सुविधा केंद्राचे' अनावरण

नागरिकांना चांगली सेवा पुरविणे हेच नागरी सेवा केंद्राचे प्राथमिक ध्येय.

आपली तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होऊन त्यांच्या समस्या दूर झाल्या पाहिजे. त्यांच्या मनात पोलीसांप्रतीचा विश्वास अधिक वाढून पोलीस जनता संबंध दृढ झाला पाहिजे. त्यासाठी वाशीम जिल्हा पोलीस दल मा.पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सतत प्रयत्नशील व उपक्रमशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम येथे विविध कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांना व नागरिकांना चांगली सेवा व मार्गदर्शन मिळावे व त्यांच्या तक्रारीचे योग्य ते निराकरण व्हावे यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम येथे नागरी सुविधा केंद्रा'ची स्थापना करण्यात आली आहे. सदर नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना समाधान हेल्पलाईन, टपाल आवक जावक तसेच सिटीझन पोर्टल ई.सेवा उपलब्ध होणार असून आज पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशीम येथे अद्ययावत 'नागरी सुविधा केंद्राचे' अनावरण मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते करण्यात आले.
सदर नागरी सुविधा केंद्राचे अनावरणप्रसंगी पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे (IPS), पो.नि. श्री. सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशीम, पो.नि. श्री. ब्रम्हदेव शेळके, प्रभा, पोलीस उपअधिक्षक (मुख्या.) यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments