Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज बारावीचा 100% निकाल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दिलीप आंबेकर

मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज ने दरवर्षी प्रमाणे निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी बारावीचा 100% निकाल लागला असुन त्यामध्ये प्रविष्ठ विद्यार्थी ८१ होते त्यापैकी प्राविण्य श्रेणी ५० तर प्रथम श्रेणी ३० आणि द्वितीय श्रेणी ०१ असा निकाल असुन त्यापैकी चांगल्या गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आज शनीवारी सकाळी १० वाजता प्राचार्य दिलीप आंबेकर यांनी सत्कार केला .यामध्ये प्रथम आलेला मोहम्मद साद अब्दुल्ला शेख, कु सायली भोजने, मो अय्युब खान, कु अनुष्का मांगुळकर, कु चैतन्या निकम, कु समिक्षा ठाकरे, कु आचल सोनोने यांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून विद्यार्थ्यांच्या  वडीलांसह सत्कार करण्यात आला . यावेळी जेष्ठ पत्रकार नाना देवळे व विनोद डेरे पत्रकार यांची उपस्थिती होती तर विद्यार्थी व पालक यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे  संचालन प्राध्यापक दिपक राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन विनोद बाबरे यांनी केले. विद्यार्थी व विद्यार्थींनी पालक व गुरुजन वर्गाचे आमच्या यशा मागे श्रेय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने बारावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा... 

Post a Comment

0 Comments