महात्मा फुले उद्यानाला वेळापत्रक देऊन सुरक्षा देण्याची गरज जनतेची मागणी.
तत्कालीन तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी मा.वैभव वाघमारे यांचे अथक प्रयत्नाने मरनासन्न अवस्थेतील महात्मा फुले ऊद्याण हे पुनर्रजिवीत करण्यात आले मात्र येथील नगर परिषद चे दुर्लक्ष असल्याने खाजगी त ढोल फोटो आंदोलन चालू असून मी सर्व काही केले असा आव आणत अधिकाऱ्यांपुढे शहाणपणाचा दिंडोरा पिटला जात असल्याचे जनतेकडून ऐकावयास मिळत असून या बाबीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष असून जिल्हाधिकारी यानी या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.
माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे कल्पने तील सुसज्ज सार्वजनिक महात्मा फुले ऊद्याणाला निधी दिला सुशोभिकरण करण्यात आले फिरण्यासाठी व आजूबाजूला भिंती सुद्धा करण्यात आल्या व त्यामध्ये थोडेफार काम करण्यात आले
व त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली असता काही काळाने ते काम नगर परिषदेच्या देख भाल व अधिपत्याखाली देण्यात आले आहे. तिथूनच या कार्याला ग्रहण लागले
परंतु महात्मा फुले उद्यानाला सुरक्षा कवच ची गरज असून व त्याचे वेळापत्रक ठरवून देण्याची नितांत गरज असल्याने या बाबीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी होत आहे.
नगर परिषदेचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष,शिपाई कधीच दिसत नाही, मधात कोण्यातरी खाजगी व्यक्तीने गवत पेटवले त्यात ऊभी हिरवीगार झाडे होरपळली व,येथील अधिकारी व नगर परिषद ने देखरेख इकडे लक्ष द्यावे अन्यथा
एखाद्या खाजगी व्यक्ती व्यक्तीकडे सोपविल्यास जनतेला पाहिजे ती सुविधा मिळणार नाहीत म्हणून वेळीच जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
नगर परिषद च्या मुख्य अधिकाऱ्यांनी या अगोदर नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाचे कुठलेही काम न करता खाजगी व्यक्तींच्या आधारे काम होत असल्याचे असा जनतेचा सूर उमटत आहे. विकास शुल्क निधी नेमका कोणाच्या घशात गेला असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मंगरूळपीर येथील उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे यांनीसुद्धा खूप मोलाचे सहकार्य केले आहे. नगरपरिषद प्रशासक म्हणून हे सध्या काम पाहत आहेत यांच्या नेतृत्वात या उद्यानाला चार चाँद लागले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही लोकांपासून सावधान राहणे खूप गरजेचे झाले आहे.
तर मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष देऊन ऊद्याणाची वेळ ही निच्छीत ठरवने व दिवसभर येथे एक शिपाई निग्रानी करीता असने . गरजेचे असल्याने येणाऱ्या शहरातून जनतेला सुरक्षा कवच मिळेल व महात्मा फुले उद्यानाची देखभाल चांगल्या प्रकारे होईल. असे मत निस्वार्थ सेवा देणाऱ्या स्वयंसेवकांचे आहे.
कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता श्रमदान करणारे
चांगल्या प्रकारची सुख-सुविधा होईपर्यंत निशुल्क सेवा जनतेला मिळावी अशीही मागणी होत आहे. आतापर्यंत सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी व स्वच्छता करण्यासाठी काही स्वयंसेवकांनी निश्चितच अहोरात्र मेहनत करून आपल्या स्वतःच्या खिशातून खर्च करून झाडे लावली आणि जगवली आहे .आजू बाजू तील परिसर स्वच्छता करण्यासाठी नी सार्थ भावनेतून सेवा करणारे स्वयंसेवक कधीच पडद्यावर आले नाही आणि आपल्या नावाचा कुठेच उल्लेख केला नाही अशीही काही स्वयंसेवक आहेत सुद्धा त्यामध्ये स्वतःच्या हातात खराटा घेऊन श्रमदान ही करण्यात आले खरे उद्यानाचे शिलेदार नेमका कोण मी केल्याचा आव आणणारे की निस्वार्थ भावनेने श्रमदान करणारे




0 Comments