शिवसेना सावध भूमिकेत
आता 20 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना सावध झालीय. 10 जागांसाठी होत असलेल्या निवडणूकित महाविकास आघाडीचे 6, भाजपचे 5 आणि भाजप निकटवर्तीय अपक्ष 1 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने 2, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि काँग्रेसने 2 उमेदवार उभे केले आहेत. आता या निवडणुकीत विजयासाठी 27 मतांचा कोटा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी पक्षाची कट टू कट मतं आहेत. 10 वी जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपची पुन्हा सर्व भिस्त पुन्हा एकदा अपक्षांवर असणार आहे. त्यात हे मतदान पूर्णपणे गोपनीय असल्याने राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीत उत्कंठा आणि रंगत वाढली आहे. गोपनीय मतदान असल्याने महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा एकदा एकमेकांची मते फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे.
शिवसेना काँग्रेसची साथ सोडणार?
यावेळी काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 10 मतांची गरज आहे काँग्रेसकडे असलेल्या 44 आमदाऱ्यांच्या ताकदीवर त्यांचा 1 उमेदवार सहज निवडून येईल. 44 मतांतून पहिल्या पसंतीची 27 मते पहिल्या उमेदवाराला गेल्यानंतर पक्षाची 17 मते शिल्लक राहतात. त्यामुळे आता काँग्रेसला इतर मतांची गरज भासणार आहे. मात्र शिवसेने साथ न दिल्यास काँग्रेसच्या उमेदवाराची अडचण होऊ शकते. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आल्याने भाजपचा आत्मविश्वास द्विगुणीत झालाय. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची मते मिळवण्याची भाजपची व्यूहरचना यशस्वी ठरलीय, त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटातलं टेन्शन वाढलं आहे. त्यातच आता शिवसेनेची ही भूमिका आघाडीसाठी वेगळी ठरणार का? हे येणारे काही दिवसच सांगतील.

0 Comments