'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या संतवचनाप्रमाणे पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सद्यस्थितीत पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल ढासळला असून त्याचे अत्यंत वाईट परिणाम आपण सध्या अनुभवत आहोत. त्यामुळे पर्यावरणाची निगा राखणे हे मानव जातीचे आद्य कर्तव्य आहे. याच पार्श्वभूमीवर आज जागतिक पर्यावरण दिना'च्या निमित्ताने वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे '
या पर्यावरण जनजागृती दौडचे एकूण तीन गटांमध्ये पुरुष गट (०५ कि.मी. धावणे), महिला गट (०३ कि.मी. धावणे) व जेष्ठ नागरिक गट (०२ कि.मी. धावणे) विभाजन करण्यात आले होते. नविन पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावरून मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवत सदर #रन फॉर ईनव्हायरमेंट पर्यावरण जनजागृती दोडला सुरुवात झाली. यामध्ये पुरुष गटातून ०५ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुरज अशोक गोडघासे, द्वितीय क्रमांक शे. समीर शे. तस्लीम व तृतीय क्रमांक रोहित गजानन घाटोळ यांनी पटकाविला, महिला गटातून ०३ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. शीतल ठाकूर, द्वितीय क्रमांक कु. प्रतीक्षा ढोले व तृतीय क्रमांक कु. मयुरी लोखंडे यांनी पटकाविला. यावेळी सदर '#रन फॉर ईनव्हायरमेंट' पर्यावरण जनजागृती दौडमध्ये परिविक्षाधीन सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS) यांनीदेखील सहभाग नोंदवीत वेळेत पूर्ण करत सहभागी स्पर्धकांचे मनोबल वाढविले. जेष्ठ नागरिक गटातून ०२ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्री. शंकर सोळंके, द्वितीय क्रमांक श्री. दिलीप घोडाम व तृतीय क्रमांक श्री अजय अरखराव यांनी पटकाविला. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व एक वृक्षाचे रोपटे मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते देऊन पर्यावरण संवर्धनसंदर्भात मोलाचे पाउल उचलण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक गटामधून स्पर्धा पूर्ण करणाऱ्या श्री. प्रदीप उत्तमराव गोटे व श्री. डीगांबर चौधरी यांना तसेच लहान मुलांमध्ये चि. स्वराज सुर्वे (वय ०५ वर्षे) यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) व स्पर्धेत सहभागी स्पर्धक यांच्याहस्ते नवीन पोलीस मुख्यालय मैदानावर दहा वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी, 'यावर्षीची जागतिक पर्यावरण दिनाची Only One Earth हि थीम असून याचा अर्थ असा कि मनुष्याला राहण्यायोग्य केवळ एकच पृथ्वी असून आपण या पृथ्वीची पर्यायाने निसर्गाची, पर्यावरणाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाची काळजी केवळ एका दिवसापुरती न करता सातत्याने निसर्ग व पर्यावरणपूरक सवयींचा आपण अंगीकार केला पाहिजे. त्यासाठी आपण वृक्षारोपण करून झाडे जगविली पाहिजे. यातूनच आपण निसर्गाचा समतोल राखून मानवजातीचे हित साधू शकतो.' असे मोलाचे मार्गदर्शन केले. सदर स्पर्धा हि मा.
परिविक्षाधीन सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS) यांच्या नेतृत्वाखाली उपविपोअ. श्री. सुनीलकुमार पुजारी, रा.पो.नि.श्री. मांगीलाल पवार, पोलीस मुख्यालय, वाशिम यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी रापोउपनि श्री. राठोड, पोलीस मुख्यालय वाशीम, सर्व कवायत निर्देशक व पोलीस अधिकारी व अंमलदार आदींनी मेहनत घेतली..
0 Comments