Ticker

6/recent/ticker-posts

सोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी? या नेत्याला मिळणार गृहखाते

सोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी? या नेत्याला मिळणार गृहखाते

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रात्री सुरू झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. गृहमंत्रालय हे पद कोणाला मिळणार यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस  नव्हे तर चंद्रकांत पाटील  आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस  हे मुख्यमंत्री होते. तेव्हा गृहमंत्रीही तेच होते. आता फडणवीसांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना हे खाते मिळण्याची शक्यता आहे. गृहखात्याबरोबरच अर्थखात्यावरही भाजपची नजर आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास प्रदेशाध्यक्षपदी एखाद्या ओबीसी नेत्याची नियुक्ती होऊ शकते.
शिवसेनेचे ४० आमदार आणि सुमारे ५० अपक्षांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतली. त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि राज्यात नवे सरकार दिले. शपथविधी सोहळा होऊन आठवडा उलटला तरी मंत्र्यांनी अद्याप शपथ घेतली नाही.सोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  शनिवारी (ता. ९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हो. मात्र, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. सोमवारी सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments