Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम शहरात महिलांचे अनैतिक व्यापार चालणा-या कुंटणखान्यावर पिटा अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


मा. पोलीस अधीक्षक साहेब यांना पिटा अंतर्गत कारवाई करणे बाबत माहिती मिळाल्याने पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना माहिती देऊन त्यांचे अधिपत्या खाली अधिकारी व पोलीस अमलदार यांचे पथक तयार कंरुन कारवाई करणे बाबत आदेशीत केले.
             संग्रही फोटो
दिनांक ०९/०७/२२ रोजी गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, वाशिम ते शेलुबाजार जाणारे रोडवरील जय गुरुदेव नगरच्या बाजुला सार्वाजनिक वस्ती असुन त्या वस्तीमध्ये रेखा इंगळे व अविनाश सोनोने हे दोघे त्याठिकाणी लोखंडी टिन शेड करुन त्यामध्ये वेश्या व्यवसायकरीता काही महिलांना आणले असुन ते त्या महिलांना अनैतिक व्यापार (वेश्या व्यवसाय) चे कमईवर त्याचे घराची उपजिवीका करतात सदर ठिकाणी जाउन महिलांचे अनैतिक व्यापार (वेश्या व्यवसाय) करणा-या महिलांना व ग्राहक तसेच घरमालक यांच्यावर स्विायांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियक १९५६ अन्वये कायदेशी करवाई करणे कामी बनावट ग्राहक यांना बोलावुन त्यांना मिळालेल्या माहीती बाबत सविस्तर माहीती देवून रेड केली असता तेथे महिलांचे अनैतिक व्यापार ( वेश्या व्यवसाय) चालविणारी एक महीला व महिलांचे अनैतिक व्यापार ( वेश्या व्यवसाय करणा-या चार पिडीत महीला सह नगदी १०,१२० रु व महिलांचे अनैतिक व्यापार (वेश्या व्यवसाय ) करीता लागणारे साहीत्यासह एकुण १०.२९०रु चा माल मिळुन आले घटनास्थळावरुन महीलांचे अनैतिक व्यापार (वेश्या व्यवसाय) चालविणारी महीला व तिचे सोबत असलेला घटनास्थळावरुन फरार झालेला अविनाश नामदेव सोनोने रा. फाळेगाव थेट यांनी सदर ठिकाणी वैश्याव्यवसायाकरीता महिलांना बोलावुन त्यांचेकडुन वैश्याव्यवसाय करुन त्यातुन मिळाणा-या पैशांवर त्यांचे घराची उपजिवीका चालवुन कुंटणखाणे चालविलणे अशा कृत्यामुळे त्यादोषांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करणे करीता पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांनी तकार देवून गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदशनात पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव, सपोनि प्रमोद इंगळे, पोहवा किशोर चिचोळकर, बाळू कंकाळ, सुनिल पवार, पोना राजेश राठोड, अमोल इंगोले, गजानन गोटे, पोका संतोष शेनकुडे, शुभम चौधरी, अविनाश वाढे, शाम इंगळे, संदिप डाखोरे व मपोहेका सुषमा तोडकर, तहेमिना शेख व अंगुलीमुद्रा तज्ञ रोहीनी रिडे, महेश आखरे, संदिप सरोदे यांनी सहभाग नोंद विला,

मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री बच्चन सिंह यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक म्हणुन, अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती दयावी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments