- 9503857998
----------------------------------------
महाराष्ट्राच्या राजकीय चर्चाविश्वात दोन राजकारणी व्यक्तिमत्वांचा प्रामुख्याने उल्लेख होत असतो . त्या दोघांविषयी बऱ्याचदा उलट - सुलट बोललं आणि लिहलंही जाते . एकदुसऱ्यांचे डाव - प्रतिडाव उलटवून टाकण्याचे धाडसी प्रयत्न सतत त्यांचेकडून होतांना दिसून येतात . यापैकी एकाची संसदीय कारकीर्द पन्नास वर्षाची तर दुसऱ्याचे अवघे वयच तेवढेसे . यातील एक व्यक्तिमत्व म्हणजेच शरद पवार आणि दुसरं आहे ते देवेंद्र फडणवीस . समान कुवत हिच या दोहोंचीही नेमकी ओळख . शरद पवारांच्या कर्तबगारीचा विचार करता त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ऊस कारखानदारीची उभारणी , शैक्षणिक संस्थांच्या कारभारात विशेष रूची , कृषी सिंचनाला प्रोत्साहन , साहित्यिक , विचारवंत , कलावंत , पत्रकार या मंडळींशी खास सलगी , क्रिडा क्षेत्रात प्रत्यक्ष वावर असा पवारांचा सर्वस्पर्शी आवाका निर्विवादपणे मान्य करण्याला कुणीही कुरकुरणार नाही. भलेही तो ठराविक जिल्हयांपुरता मर्यादित असला तरीही . म्हणूनच पवारांना चाणक्य , मुरब्बी , मुत्सद्दी , चतुर , धुर्त , जाणता नेता अशा कितीतरी विशेषणांनी त्यांचे चाहते व समर्थक संबोधत असतात .शरद पवार यांच्या राजकीय जीवन प्रवासाला तीव्र हादरा देणारे जे तिन ठळक पेच - प्रसंग घडलेत त्याचाही आता थोडा मागोवा घेऊ : - १) १९९२ मध्ये मुंबईत घडलेली बाॅंबस्फोट मालिका , २) औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करा ही मागणी असतांना तसे न करता १९९४ मध्ये १४ वर्षांनंतर फक्त नामविस्तार केला . , ३) आणि याच दरम्यान नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर आदिवासींपैकीच असलेल्या गोवारींच्या निघालेल्या मोर्च्यावर झालेला अमानुष गोळीबार आणि त्यात घडलेले हत्याकांड .या घटनाक्रमांमुळेच पवारांच्या राजकीय आयुष्याला एक काळी किनार घट्ट चिकटलेली आहे . आणि त्याचमुळे पवारांविषयी मुंबईकर व मुंबईवर आस्था असणारे इतर स्नेहीजन , आंबेडकरी अनुयायी आणि गोवारी समाज बांधव यांच्या मनामध्ये खदखदणारा सुप्त प्रक्षोभ काही प्रमाणात का असेना पण अजूनही कायम डाचलेला आहे .अशी पवारांच्या राजकारणाची खासियत राहिलेली आहे .
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेऊन आपल्या उत्कृष्ट कामाची चुणूक दाखवायला सुरुवात केली . पवारांचे त्यांच्या समोर तगडे आव्हान असतांनाही त्यांनी न डगमगता धीरोदत्तपणे , संयमाने व नम्रतेने समोरील संभाव्य संकटावर मात करत नवखेपणाची कोणतीही उणीव न दिसू देता एखाद्या अनुभवी नेत्या प्रमाणे कर्तृत्ववाचा ठसा उमटवला . जलयुक्त शिवार सारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा धडाका लावला . गृह व तत्सम महत्वाची खाती स्वत:कडे ठेवून त्यावर आपली कमांड असल्याचे सिध्द करून दाखविले . पुढे २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ' मी पुन्हा येईन ' म्हणत भाजपच्या १०५ व शिवसेनेच्या ५६ जागा जिंकून आणत युतीसाठी १६१जागेवरील स्पष्ट बहुमताचा आकडा प्राप्त केला . सेनेकडून मुख्यमंत्र्यीपदासह अर्ध्या सत्तेचा हट्ट धरून भाजपसोबत फारकत घेत शरद पवारांच्या मदतीने ' मविआ ' च्या प्रयोगाव्दारे मुख्यमंत्र्यीपद हस्तगत केले . अपार मेहनत घेऊन हातातोंडाशी आलेला घास पवारांच्या एका कुटील खेळीमुळे फडणवीसांकडून हिसकावून घेतल्या गेला . शेवटी फडणवीसांना विरोधीपक्ष नेतेपदावर समाधान मानावे लागले . याही पदावर असताना फडणवीस यांनी गृहमंत्री असेलेल्या अनिल देशमुख , अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक , सचिन वाजे , पोलिस अधिकारी परमविर सिंग यांना तुरूंगाची हवा खान्यास भाग पाडले .राज्याच्या राजकारणात पवारांना धडकी भरण्याइतपत आपल्या कामगिरीची वेगळी छाप पाडली . पवारांच्या गाठीशी अनुभवाचा डोंगर असताना सुध्दा देवेंद्र फडणवीस नामक एका पोरसवदा नेत्याने मीही पवारांवर मात करू शकतो असा विश्वास जनेतेच्या मनात निर्माण केला . यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांचा दावा खोटा ठरवत आपणच यशवंतरावाचे खरेखुरे वारस कसे आहोत हेही सिद्ध केले . " अल्पायुषी सत्ताप्राप्ती " साठी वाटेल ते . हेच पवरांचा आताफर्यंतचा एककलमी कार्यक्रम राहिलेला आहे ,तर दुरगामी सत्ताकारण हे फडवीसांचे धोरण असल्याचे दिसून येते . संघाच्या मुशीतील जडणघडण , पक्षावरील अस्सीम निष्ठा , पक्षनेतृत्वाची मान - मर्यादा , अपमान पचवून पुढे चालण्याची वृत्ती , पक्षातील बरोबरीच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद , सत्तेतील समाजिक समतोल साधण्याची हातोटी हे गुण फडणवीसांनी जाणीवपूर्वक जपले . तर पवारांनी मात्र १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्याच गोटातील आमदार फोडून स्वत:च मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला व आजही २०२२ मध्ये आपल्याच राष्ट्रवादी पक्षाच्या महाबळेश्वर येथील एका युवा शिबिरात , तरूणांनो संधी मिळत नसते तर ती हिसाकावून घ्यावी लागते असा उपदेश करत अजूनही मी ," डळमळीत विश्वाहार्ततेचा प्रणेता " या उपाधीसाठी कसा योग्य आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले . पवारांसारखा प्रचंड क्षमता असलेला नेता त्यांच्या या सततच्या धरसोडीच्या व तळ्यात मळ्यात असणाऱ्या भूमिकेमुळेच राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पदापर्यंत मजल मारू शकला नाही .our every action has a reaction हा न्याय येथे चपखल लागू पडलेला दिसून येईल . पवार - फडणवीस या दोन नेत्यांमध्ये हीच तर मोठी तफावत आहे . म्हणूनच की काय फडणवीस यांच्या मार्फत पवारांवर सूड उगवण्याचा बेत नियतीनेच बहुतेक आखलेला आहे की काय ? असेही कधी कधी वाटायला लागते . ते याच मुळे . नुकतेच ३० जून रोजी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनबद्ध पुढाकाराने जे सत्तांतर घडले त्या घोडदौडीचे सूक्ष्म अवलोकन उर्वरित भागात लेखरूपाने आणखीही वाचायला मिळणार आहेच . तूर्तास येथे विराम .
0 Comments