दिल्लीतील जंतरमंतर येथे 16 ऑगस्ट 2011पासून 13 दिवस अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते. हे आंदोलन देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढा असे सांगितले जात होते. त्यावेळी अनेक सामाजिक संघटन व धार्मिक संघटनांनी अण्णा हजारे यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी अण्णा हजारे यांना काहींनी तर देशातील दुसरे गांधी अशी उपमाही दिली होती. या आंदोलनानंतर 2014मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारून पराभव झाला होता. या आंदोलनातूनच आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता.
अण्णा हजारे यांची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. अण्णा हजारे यांनी सहा महिन्यापूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लोकायुक्त नेमण्याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.
अयोद्धेतील शंकराचार्य महाराज यांनी काल अण्णा हजारे यांची भेट घेऊन देशातील विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली. या भेटीचे फोटोही अण्णा हजारे यांच्या कार्यालयाच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड करण्यात आले आहेत. यावरूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ही भेट सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यात अयोद्धेची क्रेझ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा व अयोद्धेचा मुद्दा काढल्यापासून राज्यात उलटसुलट राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांचा अयोद्ध्या दौरा रद्द झाला. तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवारांनी अयोद्धेचा दौरा केला. त्यामुळे बातम्यात काही दिवस अयोद्धेची चर्चा राहिली. शंकरराचार्यांच्या भेटीमुळे पुन्हा अयोद्धेचे नाव चर्चेत येत आहे.
0 Comments