🏊🏻♂️🚑🚣♂️ या वर्षी सेवेचे हे आमचे सातवे वर्षे आहेत..जिवरक्षक दीपक सदाफळे .......🏊🏻♂️पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या आदेशाने दिपक सदाफळे (जिवरक्षक) यांच्या नेतृत्वात पथकाची एक रुग्णवाहिका रेस्क्यु ऑपरेशन सुविधांसह शोध व बचाव साहीत्यांसह आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन सेवा देण्यासाठी ज्ञानेश्वर म्हसाये,अतुल उमाळे, ऋषीकेश राखोंडे,मयुर सळेदार,ऋषीकेश तायडे,उमेश बिल्लेवार, अजय डाके,मयुर कळसकार,विकी साटोटे,सुरज ठाकुर, निखील ठाकरे,राम काकड,विकी पिंजरकर, शिवम वानखडे,गोविंदा ढोके,शुभम भोपळे, अंकुश चांभारे,मुन्ना अंधारे,अक्षय ठाकरे, सार्थक वानखडे,या जवानांसह पंढरपूरात रेस्क्यु टीम सेवा देत
आहे........................▶️ 9 जुलै रोजी सायंकाळी अंदाजे सहा वाजताच्या दरम्यान इस्काॅन घाटाकडे दोन युवक चंद्रभागा नदीच्या मध्यभागातुन पोहत येत असतांना यादोघांपैकी एकजण कसातरी घाट्याच्या पायरीवर पोहचला परंतु एकजण हा तीथेच दम सरल्याने गटांगळ्या खायला सुरवात करतनाकरत याचवेळी वारक-यांच्या रक्षणासाठी तैनात असेले संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांना तो युवक बुडतांनाच्या अवस्थेत दीसु लागला तेव्हा क्षणाचाही विचार न करता रेस्क्यु बोट त्या दीशेने वळविली आणी पथकाचे जवान निखील ठाकरे याने त्या युवकाच्या दिशेने लाईफ रिंग फेकली आणी पथकाचा स्विमर अजय डाके याने कव्हरिंग देऊन त्या युवकाजवळ रेस्क्युबोट नेऊन लगेच राम काकड,शिवम वानखडे, यांनी बोट मध्ये घेतले आणी पुर्णपणे सुरक्षितरीत्या वाळवंट EOC मदत केंद्रात नेऊन तहसीलदार चव्हाण यांच्या समोर सादर केले यावेळी या युवकाने सागर बाळासाहेब कराड वय अंदाजे (18) वर्ष मी आणी माझा मित्र रा.जामखेड ता.जामखेड जि.नगर चे असल्याचे सांगितले तसेच साहेबांना सांगितले की संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान आज माझ्यासाठी देवदुत ठरले आहे.आणी दोन्ही युवक एकदम ठणठणीत व पुर्णपणे सुरक्षित असल्याने जिवरक्षक दिपक सदाफळे यांच्या उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन पाहुन पथकाला EOC वाळवंट कडुनही भरभरून शाबासकीची थाप मिळाली.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
0 Comments