मंगरूळपिर शहरातील दर्गाह चौक,संत बिरबलनाथ महाराज ते अकोला चौक रस्ता गेली अनेक वर्षांपासून खड्यात गेला असून या रस्त्याने ये जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा रस्त्यावरील खड्यात मासे पकडो आंदोलन करण्यात येईल अशा आशयाची मागणी ऑटोरिक्षा चालक संघटना शहराध्यक्ष शेख नवेद यांनी दि 21 रोजी न प मुख्याधिकारी याना दिलेल्या निवेदनातुन केली होती या रास्त मागणीची दखल घेऊन दि 23 रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषदने नादुरुस्त रस्त्यावर मुरुम टाकण्याचे काम सुरू केले आहे मागणीची दखल घेतल्याबद्दल निवेदनकर्ते शेख नवेद यांनी मुख्याधिकारी यांचे आभार मानले
शहरातील संत बिरबलनाथ महाराज ते अकोला चौक व दर्गाह चौक हा रस्ता गेली अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असून या ये जा करणाऱ्या वयोवृद्ध व आजारी नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे परिणामी नागरीकाना मणक्याचे आजारांना सामोरे जावे लागत आहे तर या रस्त्याने जाणारे वाहने पुर्णतः खिळखिळी होत आहे तसेच या रस्त्यावरून धार्मिक महोत्सवात साजरा करताना मिरवणूक काढली जाते यावेळी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच या मार्गावर जि प माध्यमिक शाळा, महाविद्यालयात, तसेच सिद्धार्थ विद्यालय या शाळा आहेत या शाळेतील विध्यार्थ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते याशिवाय या दुरुस्तीसाठी दि 7 /1/2022 रोजी पालिकेला लेखी निवेदन दिले होते मात्र अद्यापही दखल घेतली नव्हती परंतु नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर मुरुड टाकण्याचे काम सुरू केले आहे या कामाची तत्परता लक्षात घेऊन नागरिकांनी आभार मानले आहे
रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देण्याकरीता शेख नवेद, शेख इमरान,सागर उखळकर, रवी ठाकूर, फैजन खान, अंकुश डोके, मुकुंदसिंग रघुवंशी, आदींनी पुढाकार घेतला होता
0 Comments