या गंभीर अपघातानंतर विनायक मेटेंना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांचं अपघातस्थळीच निधन झालं होतं. याशिवाय त्यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. विनायक मेटे यांचा मुलगा देखील यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असल्याने त्यालाही किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे.
या भीषण अपघातात विनायक मेटेंचा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
0 Comments