Ticker

6/recent/ticker-posts

मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा


 मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवार दि. 21 सप्टेंबर 2022 ला अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर  राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा वाशिम यांच्या वतीने   अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे  हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून  राज्य सरचिटणीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  कृष्णात स्वाती,  जिल्हा कार्याध्यक्ष वाशिमचे पी एस खंदारे व सुखदेव इंगळे प्राचार्य डॉ जी एस कुबड़े यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.  विकास चांदजकर यांनी केले. त्यात त्यांनी आधुनिक युगात देखील अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत असून   त्यामध्ये सर्वच वयोगटातील  व्यक्तींचा समावेश आहे. विशेषतः समाजातील महिला अंधश्रद्धेला  अधिक प्रमाणात बळी पडताना दिसतात.नरबळी चे प्रकार वाढले आहेत वैज्ञानिकता मागे पडत आहे. समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धेपासून युवकांना  बाजूला करण्यासाठी  या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना कृष्णात स्वाती यांनी देशाची प्रगती करायची असेल तर युवकांना पुढाकार घेऊन प्रथम आपले गाव अंधश्रद्धा मुक्त करावे लागेल त्यानंतरच समाज व देश अंधश्रद्धा मुक्त होऊ शकेल. समाजामध्ये अनेक अनिष्ट प्रथा व रूढी आहेत त्यामुळे वन्य पशु प्राण्याचे जीवन देखील संकटात सापडले आहे. मांजर आडवे जाणे, घुबडाचे तोंड पाहणे  अशुभ मानणे या सर्व गोष्टी  अनावश्यक असून विज्ञान निष्ठा जपण्याचे आवाहन त्यांनी केले. पी एस खंदारे यांनी आपल्या मार्गदर्शनात आधुनिक   युगात मानव  हा चंद्र व मंगळावर जात आहे तरीदेखील भारतीय समाज मात्र अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन समाजाला मागे नेण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. नारायणराव गोटे यांनी  विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून इतरांनाही प्रेरणा देण्याचे कार्य करण्याचे सांगितले. तसेच अंधश्रद्धा विरुद्ध आवाज  उठवण्याचे आव्हान देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन  कु. अंजली वानखेडे हिने केले तर उपस्थितांचे आभार कु. वैष्णवी ठाकरे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सविता  रूके, डॉ  डी आर दामोदर, डॉ व्ही एन लांडे, श्रद्धा अडाने, अनंत इंगळे, शुभम लांडकर, निखिल वैद्य,  प्रियंका बरखाम, आरती भालेराव, शिवानी बयस, साक्षी बियाणी, विजया खंदारे, दीक्षा तायडे, शुभम लांडकर, प्रज्वल जिजोते , प्रशांत भगत,  हर्षा अवचार, सागर वानखेडे, राधा ठाकरे, शैलेश टेकाळे, रोहिणी इंगळे, स्वाती इंगळे , सायमा पप्पूवाले, मुस्कान भवानीवाले,समाधान राजगुरू आदींनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments