Ticker

6/recent/ticker-posts

दोन दिवसीय पुर्णायु चिकीत्सा शिबीराला भव्य प्रतिसाददोन हजार पाचशे रूग्णांना घेतला लाभ: मुनीसंघासह आचार्य श्री यांची उपस्थिती


वाशीम : संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या समवेत निर्यापक श्रमणमुनीश्री प्रसादसागरजी महाराज, मुनीश्री चंद्रप्रभसागरजी महाराज, मुनीश्री निरामयसागरजी महाराज, ऐलकश्री सिध्दांतसागरजी महाराज यांच्या आशिर्वाद व सानिध्यामध्ये चातुर्मास समिती व सकल जैन समाजाच्या वतीने शिरपूर जैन येथील मंगल भवन येथे 17 व 18 सप्टेंबर रोजी आयुर्वेद, जडीबुटी, काढा, प्राणायम, अ‍ॅक्युप्रेशर, मर्म चिकीत्साव्दारे प्राचीन चिकीत्सा पध्दतीने उपचार संदर्भात दोन दिवसीय पुर्णायु चिकीत्सा शिबीराला  भव्य प्रतिसाद मिळाला.  सदर शिबीरात दोन हजार पाचशे रूग्णांनी लाभ घेवून मासाहार, तंबाखु, दारू, गुटखा, फास्टफुड, अंडे आदिच्या सेवनाने शरीरामध्ये वेगवेगळया आजाराची निर्मीती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या सर्व गोष्टींचा त्याग करून मनुष्य जिवन हे किती उपयोगी आहे याचे महत्व त्यांना कळाले.  आचार्य श्री विद्यासागरजी महाराज मुनीसंघासह शिबीरामध्ये भेट देवून त्यांनी आशिर्वाद प्रदान केलेत. वर्षा कमेटीच्या वतीने दिप प्रज्वलन करून शिबीराचे रितसर उद्घाटन करण्यात आले.  
शिरपूर जैन येथील मंगलभवन येथे पावन  वर्षायोग समिती व जैन समाजाच्या वतीने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवसीय शिबीर पार पडले.   सदर शिबीरात मुंबई येथील डॉ. सुहास शहा, मोनिका शहा, इंदौर येथील सचिन, डॉ. पारस, डॉ. गौरव, डॉ. मिथलेश  जागपूर, पुर्णायु जबलपूरचे ब्रम्हाचारी आशिष, ब्रम्हचारी मनिष, ब्रम्हचारी रोहत, डॉ. महेंद्र पांडे, डॉ. अनुप भुरे, डॉ. संजय पुलारी, डॉ. सुरेश, वैद्य शिब्बुलाल बुधणी, बडोदरा येथील प्रशांतसिध्दांत, डॉ. प्रशांत रोकडे यांनी  सेवा प्रदान केली. रूग्णाची तपासणी करून त्यांना योग मार्गदर्शन व आयुर्वेदीक काढे , औषधी व मर्मचिकीत्साव्दारे निदान करण्यात आले.   शिबीरात सेवा प्रदान करणार्‍या सर्व चिकीत्सकांचा सन्मान व आभार ब्रम्हचारी तात्याभैय्या यांच्याहस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.  सदर शिबीराच्या यशस्वीतेकरीता मुख्य संचालक बालब्रम्हचारी तात्या भैय्या, पावन वर्षा योग समिती अध्यक्ष मुंकूंद वालचाळे, महामंत्री अ‍ॅड. धनंजय रोकडे, कार्याध्यक्ष जितेंद्र छाबडा, प्रवक्ता डॉ. अभयकुमार गुंगे , वर्षायोग समितीचे पदाधिकारी  तसेच नवयुवक मंडळ, बालिका मंडळ शिरपूर जैन व ज्ञानवर्धन मंडळ सांगली यांनी परिश्रम घेतले.  

Post a Comment

0 Comments