Ticker

6/recent/ticker-posts

मूर्तीजापूर तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा – सुनील सरदार ( तालुका अध्यक्ष वंचित )


• मुर्तीजापुर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करून पिक विमा ची मदत  सरसकट द्या..
मूर्तीजापूर २० , वंचित बहुजन आघाडी मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मुली निगडे यांचे नेतृत्वाखाली मुर्तीजापुर तालुका अध्यक्ष सुनील सरदार यांच्या नेतृत्वात दि.19 ला उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले . मुर्तिजापूर तालुक्यात पावसाचे आगमनापासून तर आज पावतो पावसाने थैमान घातला आहे सतत धार पाऊस अतिवृष्टी ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तिबार पेरणी करुनहीं  हाती अपयश आलेआहे ज्या शेतकऱ्यांचे पिके काही प्रमाणात वाचवल्या गेली होती तीही सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिवळी पडून सर्वच पिकेही पाण्याखाली बुडालेली आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून मुर्तिजापूर तालुक्यात सर्वोच मंडळातील शेतकऱ्यांना सर्व पिकासाठी सरसकट पिक विमा द्यावा. तसेच शासन स्तरावरून मिळणा-या मदतीस मुर्तिजापूर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पात्र ठरवावे. शेतकऱ्यांना आज रोजी शासन मदतीची गरज आहे. या ओल्या दुष्काळामुळे पिकाचे झालेले नुकसान पाहून व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून अकोला जिल्ह्यातील व मुर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत शासनाने जर जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वच पिकांना मदत जाहीर केली तर या मदतीचा खूप मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल व रोजच्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल. तरी आपण सदर निवेदनाची दखल घेऊन तालुक्यातील सर्वच मंडळातील पिकांना सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा व शासकीय मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष सुनीलभाऊ सरदार , महासचिव अक्षय जोंगळे , प्रसिद्धी प्रमुख अतुल नवघरे , कोषाध्यक्ष गौरव मेसरे , प्रधान गुरुजी , पंडितराव वाघमारे ,देवानंद जामनिक , संजयपाटील वानखडे , रवींद्र घुरडे , सुनील तामखाने , संजय नाईक , तसवर खान , बाळू ठोकळ , संदीप सरनाईक ,  शेख इम्रान शेख खलील , करण वानखडे , वैभव यादव , अब्दुल परवेज अब्दुल मलिक , मोहन आटोटे , मनोज तायडे , गोविंद कोकणे , नितीन इंगळे , सतीष खंडारे , सुधीर गुंजाळ , प्रभाकर वर्घट , साहेबराव वर्घट , आकाश वर्घट , मयूर वर्घट , ओंकार वर्घट , लक्ष्मी वानखडे , अजय वानखडे , राजूभाऊ खनपटे , सीमा इंगळे  , कौशल्या साबळे , बेबीताई चव्हाण , पियुष प्रभे , बंडूभाऊ वानखडे , सचिन दिवनाले , संकेत कोल्हे , कलीम खान , दुर्गा वानखडे , रिना राऊत , वं‌दना राऊत , वनिता राऊत , माला राऊत , विजय आटोटे , पुष्पा भोरखडे , सागर चावरे आकाराम भोरखडे , युवराज जोगदंड , ऋषिकेश सातिंगे , सुशांत हेंगड , रमेश गोपकर , महेंद्र तायडे , अरविंद जामनिक , रितेश गोपकर , अमोल खंडारे , अंतंगत बोरकर , सोनू शेख , शैलेश जावरकर , राजकुमार खडसे , उमेश वानखडे , मंगेश गावंडे , राहुल शिरनाथ , सचिन शिरनाथ , मिलिंद डोंगरे , रोशन वानखडे , बाळू भगत , गोवर्धन सिरसाट , विनोद इंगळे ,अयनुक जे नोहीन शेख , राजकुमार खडसे , तेजराव जाधव , शुभम कोगदे , इ. बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments