Ticker

6/recent/ticker-posts

चांगले कर्म व कार्य व्यक्तीला यश प्रदान करतात: आचार्य विद्यासागरजी महाराज



वाशीम : जीवनामध्ये चांगले कर्म व कार्य केल्यास त्या व्यक्तीला यश प्राप्त होते.  कर्माला सर्वाधिक महत्व आहे.  प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याचे पालन करून गाव, समाज, देश याला महत्व देवून जास्तीत जास्त जनसेवेची कार्य करण्यास प्राथमिकता दिली तर विकासाचे मार्ग प्रशस्त होतात असे प्रतिपादन संत शिरोमनी आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी केले. शिरपूर येथे निकलंक निकेतन येथे वाशीम मंगरूळपीर विधानसभा आमदार लखन मलिक, सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी, भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर, हभप गजानन महाराज शिंदे, नितेश मलिक, रोहित मलिक, निलेश जैस्वाल, तेजस सोमाणी, नागेश मलिक, जीवन अग्रवाल, विरेंद्र बागरेचा, गणेश ठाकरे यांनी आचार्य श्री यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून आशिर्वाद घेतले. आचार्य श्री यांच्या कक्षात निर्यापक श्रमणमुनीश्री प्रसादसागरजी महाराज उपस्थित होते.   यावेळी आ. लखन मलिक यांनी आपल्या जनतेच्या सोबत राहत असून त्यांच्या सहकार्याने व विश्वासाने गत चार टर्मपासून आपण लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहोत.  मतदार  संघाच्या सर्वागिण विकासासोबतच जनतेची कार्य व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जास्तीत जास्त जनसेवेला प्राथमिकता देण्याची आपली भावना अधिक प्रगल्भ होवून कार्य व्हावे असे निवेदन करून आशिर्वाद घेतले.  ऐलक श्री सिध्दांतसागरजी महाराज यांनी व्यक्ती हा पदामुळे नव्हे तर त्याच्या कार्यामुळे मोठे होत असतो. जैन समाजामध्ये व्यक्तीला नव्हे तर व्यक्तीत्वाची पुजा होते.  गत चार टर्मपासून आपण पदापेक्षा जनसेवा व जनतेमध्ये राहत असल्याने आपणास वारंवार ही संधी मिळत आहे. आपण जास्तीत जास्त जनउपयोगी कार्य करा अशी सुचना करून आशिर्वाद दिले. यावेळी श्री सिध्दांतसागरजी महाराज यांनी आचार्य श्री यांची माहिती असलेले पुस्तक आ. मलिक यांना भेट देवून सत्कार केला. तद्नंतर चातुर्मास समितीच्या वतीने आ. मलिक, जेईई व सिईटी परिक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल तेजस सोमाणी, शिरपूर येथील सरपंच सौ. अढागळेताई , ग्रामविकास अधिकारी भुरकाडे , अढागळे व सोबत असलेल्या सर्वांचा शाल,श्रीफळ व मोतीची माळ, सन्मान चिन्ह देवून चातुर्मास समितीचे प्रवक्ता डॉ. अभयकुमार गुंगे, महामंत्री अ‍ॅड. धनंजय रोकडे, सुनिल महाजन, कोषाध्यक्ष हितेश रूईवाले, संजय विश्वंभर, आकाश महाजन,  अनिल वाल्ले आदिंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चौकट
सर्वसामान्यासाठी निवडला खडतर मार्ग
आ. लखन मलिक हे सर्वसामान्याचे आमदार म्हणून ओळखले जातात. शिरपूर येथे आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या दर्शनासाठी जातांना सोनखास फाटयावर एक व्यक्ती लहान मुलासोबत उभे असल्याचे त्यांना गाडीतून दिसले.  आ. मलिक यांनी त्यांची विचारपूस करून कोठे जायचे आहे असा प्रश्न केला त्या व्यक्तीने तामसी येथै जात असल्याचे सांगीतले. वास्तवीक शिरपूर येथे मालेगाव मार्गे जाण्याचे निश्चीत होते मात्र आ. मलिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांची दुसरी गाडी मालेगाव मार्गे शिरपूर पाठवीली. सदर व्यक्ती पोफळे यांना लहान मुलासोबत आपल्या गाडीत बसून खडतर मार्गे तामसी येथे पोहचून शिरपूर गाठले. सर्वसामान्यासठी आ. मलिक यांनी आपला नियोजित मार्ग बदलून खडतर मार्गाने शिरपूर गाठले.  सर्वसामान्यांची आशिर्वाद हीच आपली खरी पुंजी व दौलत असल्याचे आ. मलिक यांनी चर्चेदरम्यान सांगीतले.  सदर व्यक्ती हा या प्रवासाने व भेटीने भाऊक झाला.    

Post a Comment

0 Comments