Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची मंगरुळपीर तालुक्यात भेट,

मंगरूळपीर:-दिनांक 20/09/2022 रोजी वसुमना पंत , मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,वाशिम यांनी मंगरूळपीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,कवठळ व जिल्हा परिषद प्रा शाळा,कोठारी  येथे भेट दिली.या भेटी दरम्यान निपुण,सेतू चाचणी ,परसबाग ,वृक्षारोपण,भौतिक सुविधा,शालेय गुणवत्ता ,रेंनहार्वेस्टिंग बद्दल व शिक्षण विभागाबद्दल समाधान व्यक्त केले पुढेही असे कार्य चालू ठेवावे अशी आशा व्यक्त केली व शिक्षण विभागाचे कामाविषयी समाधान व्यक्त केले. मुला मुलींची संवाद साधून विविध प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांना बोलके केले.
यावेळी वसुमना पंत , मुख्यकार्यकारी अधिकारी  यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात, वृक्षारोपण केले.विविध ठिकाणी अंगणवाडीला भेटीही दिल्या. तसेच मंगरूळपीर येथील नवीन पंचायत समिती येथील संपूर्ण विभागाची पाहणी केली.


Post a Comment

0 Comments