भावनाताई गवळी यांनी गाव दत्तक घेतलेल्या सायखेडा येथील दलित वस्तीतली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बंद, गावातील महिला व नागरिकांना पाण्यासाठी करावी लागते पायपीट
ताईने घेतलेल्या दत्तक गावाचा बोलबाला पाण्यासाठी गावाच्या बाहेर झाला
मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा या गावांमध्ये चार महिन्यापासून दलित वस्तीतली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बंद आहे . पाईप लाईन बंद असल्यामुळे खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे . गावातून दोन किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे ते पण पाणी दूषित असल्याने दलित वस्ती मधले प्रत्येक घरचे कोणी ना कोणी आजारी पडतआहेत सोयाबीन काढणीचे दिवस असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे सोयाबीनचा मजुरीसाठी कामावर जावे की नाही असेही झाले आहे. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोयाबीन सोगावे लागते मोठा प्रश्न पडला की पाणी कधी भरायचे गावातील सरपंच व सचिव यांचे कुठलेही लक्ष नाही अवघ्या काही दिवसात पाईपलाईन चालू न झाल्यास पंचायत समिती गेट समोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भगत यांनी दिला आहे. चर्चेत असलेल्या खासदार भावनाताई गवळी यांच्याच गटाचे सरपंच असून व तेच त्याच गटाचे तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत त्याच गावांमध्ये चार महिने प्रश्न मार्गी लागत नाही तर इतर गावांचे काय हा प्रश्न जनतेला पडला जिल्ह्याच्या विकासाच्या बोंबा मारणाऱ्यांना दत्तक घेतलेल्या गावाचं काय. पाईपलाईन चालू करा नाहीतर आमरण उपोषण करणार.
0 Comments