मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हयांना आळा बसावा, याकरीता महीला व मुलीचे सुरक्षेकरीता अनेक उपक्रम हाती घेतलेले असून महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक याची स्थापना करुन गरजुंना विहित वेळेत मदत उपलब्ध करुन दिली तसेच वाशिम जिल्हयात हरविलेल्या व पळविलेल्या महीला आणि मूलीचे शोध घेणेकरीता अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
वाशिम जिल्हयातील पोलीस स्टेशन अंतर्गत पळवून नेलेल्या मुलीये दाखल गुन्हयातील आरोपी तसेच पिडीतांचे शोध न लागल्याने सदरची प्रलंबीत असून सदर गुन्हयांतील मुलींचे शोध घेणे करीता सदरचे प्रकरणे अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम यांचे कडे वर्ग करण्यात आलेले आहेत. सदरचे प्राप्त प्रकरणापैकी पो.स्टे. वाशिम येथील दाखल गुन्हयातील ४ वर्षा पासून अपहृत असलेल्या ०१ बालीका तसेच पो.स्टे. मालेगाव येथील दाखल वेगवेगळ्या गुन्हयातील एकूण ०३ अपहुत बालीका तसेच पो.स्टे. मानोरा येथील दाखल गुन्हयातील ०१ अपहृत बालीका, पो.स्टे. जउळका दाखल गुन्हयातील ०१ अपहृत बालोका आणि स्टे कारंजा ग्रामीण गुन्हयातील ०१ अपहृत बालकांचा शोध लावण्यात आला आहे.
तसेच पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथील अप. न.१३/२०१४ कलम ३६३ भादवि प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी वामन फकीरा महाले रा. कळंबा महाली यांची अपहृत बालीका हिला आरोपी पांडूरंग गुलाबराव महाले रा. कळवा महाली याने ९ वर्षा अगोदर फूस लावून पळवून नेले होते. सदरचे गुन्हयातील पिडीता हिचे शोधा बाबत सर्वोतरी प्रयत्न करूण मिळालेल्या माहीती वरूण पिडीता हिला आरोपी याने शिर्डी येथे ठेवल्याचे समजले वरूण नमूद पिडीता व आरोपीताचा शोध घेतला पिडीता ही शिर्डी येथे मिळून आली तसेच आरोपी याला सुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. मागील ९ वर्षा पासून आरोपी याने फूस लावून पळवून नेलेल्या अपहृत बालीका हिचा शोध घेण्यात अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांना यश प्राप्त झाले आहे. अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वाशिम यांनी प्रदीर्घ अशा ४-४ वर्षा पासून अपहूत असलेल्या बालकांचा शोध घेतला असून आता पावेतो एकूण ८ अपहूत बालोकांचा शोध घेण्यात आलेला आहे.
तसेच अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम यांनी चालू वर्षात माहे जानेवारी पासून वाशिम जिल्हयातील पळविलेल्या लहान मुले-मूली यांचे दाखल प्रकरणातील पळविलेल्या ५४ मुलीपैकी ४६ मुलींचा शोध लावण्यात आलेला असून पळविलेल्या ३ मुलापैकी २ मुलांचा शोध लावण्यात आलेला आहे. हरविलेल्या पळविलेल्या मुला मुलीचे शोध घेण्या करीता वेळोवेळी जिल्हा स्तरावर विषेश मोहीम राबविण्यात येत आहेत. अशा प्रकारे अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम पथकास बरेच कालावधी पासून मिळून न आलेल्या
अपहृत वालीका, हरविलेल्या पळविलेल्या इसमांचा शोध घेण्यात तसेच वाशिम जिल्हयातील वेश्या व्यवसाय चालविणारे
ठिकाणी प्रभावी कार्यवाही करण्यात यश मिळाले आहे. तसेच इतरही गुन्हयातील अदयापही मिळून न आलेल्या अपहृत बालका
यांचा शोध घेण्याकरीता सर्वोत्तरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह, अप्पर
पोलीस अधिक्षक गोरख भामरे, प्रभारी अधिकारी जगदीश पांडे, उप विभागीय अधिकारी कारंजा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक,
सोमनाथ जाधव, मपोउपनि एस.एम. इथापे पोहेकॉ संदीप निखाडे, मपोकों/ विणू सुर्यवंशी यानी सहभाग दिला आहे
0 Comments