वाशिम जिल्ह्यात नवीन महामार्गाच्या निर्मितीमुळे वाहनधारक भरधाव वेगाने दुचाकी व चारचाकी चालवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चनसिंह यांनी पेडगाव त-हाळा, शेलुबाजार, वनोजा, जऊळका, आदी ठिकाणांची पाहणी केली.
दिशा दर्शक फलक बसविण्याबाबत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी श्री. यशवंत केडगे, एस. डी. पी ओ . मा. सुनील हुड ठाणेदार मंगरुळपीर, मा. आजिनाथ मोरे ठाणेदार जऊळका, मंजूषा मोरे पीएसआय, आर. टी. ओ. , विभागाचे अधिकारी, साळूंकाबाई राऊत आपत्ती व्यवस्थापन पथक वनोजा, स्थानिक स्वयंसेवक, पत्रकार आदी उपस्थित होते .
0 Comments