Ticker

6/recent/ticker-posts

अंधेरीत मशाल पेटली, आदित्य वाढला, ट्विट करुनठाकरेंचा आत्मविश्वासम्हणाले...

भाजपच्या माघारीनंतर काहीशा एकतर्फी झालेल्या, पण नोटा फॅक्टरमुळे मोठ्या उलटफेराची शक्यता असलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी निर्विवाद विजय मिळाला. या पोटनिवडणुकीत नोटाला लक्षणी मतं पडली असली तरी त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून या विजयामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावल्याचे संकेत दिले. हा विजय म्हणजे निष्ठेचा विजय असल्याचे आदित्य यांनी म्हटले.आदित्य ठाकरे यांनी ट्विट करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ऋतुजा लटके आणि शिवसेनेचे मशाल हे चिन्ह ठळकपणे दिसत आहे. हीच मशाल आता संपूर्ण मुंबईभर नव्हे महाराष्ट्रभर धगधगणार, असे सांगत भविष्यात आक्रमकपणे लढण्याचे संकेत दिले : आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे! ह्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.सकाळी आठ वाजल्यापासून अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच
ऋतुजा लटके आघाडीवर होत्या.ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले. ऋतुजा लटके यांच्या विजयाने ठाकरे गटाच्या शिवसेनेने शिंदेंच्या बंडानंतर मशाल चिन्हावर पहिला आमदार निवडून आणला आहे. मशाल चिन्हावरील हा विजय उद्धव ठाकरेंचा खूप महत्वाचा आणि बळ देणारा ठरण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments