बुलढाणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सभा आणि नेत्यांच्या दौन्यांना राज्यातील जनतेकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मिंधे सरकारचे धाबे दणाणले आहेत. यामुळे शिवसेना नेत्यांच्या सभांना अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ७ नोव्हेंबर रोजी बुलढाणा शहरात होणाऱ्या शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेला कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत मिंधे सरकारने परवानगी नाकारली आहे.
अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत. याचा जाब शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून विचारला जात आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी ते
घेत असलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मिंधे सरकारला पळता भुई थोडी झाल्याने शिवसेनेच्या सभा रोखण्याचे उद्योग राज्यात सुरू झाले आहेत. सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात गांधी भवन परिसरात आयोजित केलेल्या नियोजित सभेला ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली आहे.
बुलढाणा शहरातील गांधी भवन हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जाहीर सभांसाठी ते प्राधान्याने निवडले जाते. त्यानुसार शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मागण्यात आली होती; परंतु शिंदे गटाच्या राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली. याआधी सिल्लोड येथील सभेलाही परवानगी नाकारण्यात आली होती. तर दुसरीकडे त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राच्या सभेला प्रशासनाने परवानगी दिली आहे.
उद्या सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर | आदित्य ठाकरे ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महावीर चौकात त्यांची सभा होण्याची शक्यता होती, मात्र नगरपालिका व पोलीस प्रशासनाने वाहतुकीस अडथळा येत असल्याचे सांगत सभेस परवानगी नाकारत अन्य जागेवर सभा घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे हे सभा न घेता सोमवारी थेट शेतकन्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
0 Comments