संजय राऊत यांचा टोला
राज्यपालांच्या या बातमीसंदर्भात खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ट्विट केलंय. महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने (Shivsena) महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटंलय. तसंच राज्यपालांकडून शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही भाजपचे टगे शहाणपण शिकवतात अशी टीका संजय राऊत यांनी केली.
अजित पवार यांनी केला दावा
भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या राज्यात परतायचं असल्याची इच्छा त्यांनी आपल्याजवळ बोलून दाखवल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. मात्र त्यामागे काय कारण आहे हे त्यांनी सांगितलं नसल्याचंही अजित पवारांनी सांगितलं
0 Comments