Ticker

6/recent/ticker-posts

थोर अशी आमची जिजाऊ..............

वर्ल्ड स्पीड न्यूज वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी

जिजाबाई या पहिल्या महिला होत्या ज्यांनी दक्षिण भारतात हिंदुत्वाची स्थापना यशस्वी केली, त्यांच्या संस्कारामुळे शिवाजी महाराजांनी मराठ्यांसाठी शस्त्र उचलले व स्वराज्य स्थापन केले.इतिहास कितीही वाचला तरी मराठा साम्राज्यात जर कोणाचे नाव प्रथम येत असेल तर ती राष्ट्रमाता जिजाऊ आणि त्यांचे पुत्र शिवाजी महाराज. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना असे शिक्षण दिले की त्यांनी मराठी साम्राज्याची स्थापना केली. जिजाबाई अतिशय हुशार आणि कर्तबगार महिला होत्या त्यांनी मराठा साम्राज्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले त्यामुळेच मराठी साम्राज्य स्थापन झाले. जिजाबाई  दूरदृष्टी आणि युद्ध धोरणीक स्त्री होत्या, जिजाबाईंनी नेहमी स्त्रियांचे रक्षण करणे  व त्याचे महत्त्व मुलांना समजून सांगितले. जिजाऊंनी लहानपणीच आपल्या शिवरायांना महाभारत व रामायणाच्या कथा सांगून एक योद्धा बनण्यासाठी प्रेरित केले. शिवाजी राजे स्वतः जिजाबाई कडून युद्धनीती शिकत असत आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. जिजाऊंच्या काळात अजिबात परिस्थिती अनुकूल नव्हती  त्यांच्या आयुष्यात  अनेक संकटे आली खूप संघर्ष व त्याग पण अशा परिस्थितीत त्या मागे हटल्या नाही त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांना घडवलं  महाराज पोटात असतानाच त्यांच्या मनात स्वराज्य विषयी त्या स्वप्न पाहू लागल्या आणि तेव्हापासूनच शिवाजी महाराजांवर संस्कार करण्यास  सुरुवात झाली आणि त्यातूनच शिवाजी महाराज घडत गेले, त्या स्वतः घोडेस्वारी व तलवार बाजी करायच्या आणि त्यांनी महाराजांना पण शिकवले त्या स्वतः लढाई करण्यासाठी जात असत.  त्या काळात महिलांवर मुघलं अन्याय, अत्याचार करत हे बघून जिजाबाईंचे मन कासाविस होतं होते. त्यांनी ठरवले की रयतेवर होणारे अन्याय अत्याचार थांबण्यासाठी आपल्या मुलाला आपण तयार करायचे आहे आणि मराठी स्वराज्य स्थापन करायचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते शिवाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांनी ती पूर्ण करून घेतली. बहिणी आपल्या मुलाला युद्धनीतीचे धडे देताना ज्येष्ठ व्यक्तींचा आदर व परस्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली, परस्त्री ही माता व बहिणी समान हे संस्कार त्यांच्यामध्ये रुजवले. तसे बघितले तर आताचा काळ जिजामाताचे संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या मुलांवर करणे गरजेचे आहे. समाजामध्ये आता ज्या घटना घडत आहे महिलांवर अन्याय, अत्याचार. जर  प्रत्येक मुलांमध्ये लहानपणीपासून महिलांकडे बघण्याची निकोपदृष्टी असेल तर अशा कितीतरी घटना  घडण्याचा टाळल्या जातील एक समाजामध्ये नवीन बदल होईल शिवाजी महाराजांची जयंती व जिजाऊंची जयंती साजरी करताना अगोदर हे लक्षात ठेवावे की त्यांनी जे विचार आपल्याला दिले ते आपण आपल्या मुलांवर संस्कार करणे सध्या काळाची गरज आहे.
शिवाजी महाराज घडवायचे असतील तर प्रत्येक महिलेने आता जिजाऊ बनने काळाची गरज आहे प्रत्येक महिला ही जिजाऊ चे विचार आपल्या अंगी बाळगुण आपल्या मुलांनाही तसेच संस्कार दिले तरच तुम्ही स्वतः व स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करू शकता. स्वतःच्या रक्षणासाठी प्रत्येक मुलींनी आता संरक्षणाचे धडे जिजाऊ सारखे घ्यावे लागतील. प्रत्येक मुलीने स्वतःच्या रक्षणासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःचे संरक्षण करणे ही पण काळाची गरज आहे असे केले तरच जिजाऊ जयंती साजरी केली याचे  फलित होईल
सौ.अश्विनी राम औताडे. समाजसेविका मंगरूळपीर

Post a Comment

0 Comments