Ticker

6/recent/ticker-posts

लाखपुरी गावाला लालपरी चा ठेंगा .....


       जलद व सर्वसाधारण बस गावात न येता परस्पर फाट्यावरून धावते....                  
विद्यार्थ्यांची गैरसोय, विद्यार्थी लाल परी च्या प्रतीक्षेत, मुख्यमंत्री साहेब या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागेल का अशी चर्चा जनसामान्यात 

·      लाखपुरी येथे नियमीत बस फे-या सुरु करा- सौ. मिनल नवघरे ( माजी.पं. स. सदस्या लाखपुरी ) यांची मागणी...

 

लाखपुरी : १९ , मुर्तिजापुर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल असलेल्या लाखपुरी हे तिर्थ क्षेत्र लक्षेश्वर संस्थानच्या नावाने प्रसिध्द असलेल्या  तालुक्यातील २२ गावाशी जोडल्यागेलेल्या जिल्हा परिषद सर्कल असलेल्या लाखपुरी गावात जलद बसेस व सर्वसाधारण बस गावात येत नाही. व त्यातच थोड्या फार जलद बसेस फे-या फाट्यावरून धावतात. तर कधी कधी तर जलद बस पाट्यावर थांबत नाही.  त्यामुळे विद्यार्थ्यांना  खासगी  वाहनाने प्रवास करावा लागत आहे . बसची पास असुनही  विद्यार्थ्यांना  आर्थिक भुर्दंड बसत आहे व जवळपास २२ गावे  जोडल्या गेलेल्या  लाखपुरी ,पायटांगी, दुर्गवाडा , दापुरा , खापरवाडा, लोणसना , विरवाडा ,कोळसरा , दातवी , टाकळी, भुजवाडा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी  व स्पर्धा  परिक्षेच्या तयारी साठी मुर्तिजापुर , दर्यापुर , अकोला अमरावतीला येणे  जाणे करतात त्याचे आर्थिक शैक्षणीक नुकसान होत आहे रात्री बेरात्री सुध्दा बस गावात येत नाही त्यामुळे विद्यार्थी , वुध्द ,अपंग , जेष्ठ नागरीक  , महिला वर्ग  प्रवाशी वर्गांची गैर सोय होत आहे व रात्री बेरात्री सुध्दा बस गावात येत नसल्यामुळे वृध्द , महिला , विद्यार्थी यांना फाट्यावरुन पायदळ यावे लागते याकडे शासनाचे  दुर्लक्ष होत आहे. जलद व सर्वसाधारण बसफेरी दैनंदिन गावात आणण्याचे निर्देश मुर्तिजापुर व दर्य़ापुर आगराला द्यावे. जर यांची दखल ८ दिवसात जर न घेतल्यास परिवहन मंत्री  यांना निवेदन देण्यात येणार व मा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुध्दा निवेदन देण्याचा इशारा माजी पं. स. सदस्या मिनल नवघरे यांच्या सह संपुर्ण खेड्यातील विद्यार्थी , गावातील नागरीकानी दिला आहे.

 

 

 

लाखपुरी येथे गावात बस येत नाही त्यामुळे विद्यार्थी , वुध्द ,अपंग , जेष्ठ नागरीक  , महिला वर्ग  प्रवाशी वर्गांची गैर सोय होत आहे व रात्री बेरात्री सुध्दा बस गावात येत नसल्यामुळे वृध्द , महिला , विद्यार्थी यांना फाट्यावरुन पायदळ यावे लागते. यावर प्रशासना व्दारे योग्य भुमिका न घेतल्यास संबंधित विभागाकडे व परिवहन मंत्री यांना याबाबत पत्र पाठविनाऱ .

 सौ. मिनल नवघरे (माजी. पं. स. सदस्या लाखपुरी

 

 लाखपुरी येथे गावात बस येत नाही. त्यामुळे आम्हाला व आमच्या पाल्यांना १ किलो मी. अंतर अंतर असलेल्या फाट्यावर जावे लागते त्यामुळे खूप त्रास होतो.

गजानन डहाके (नागरिक लाखपुरी  )

 

लाखपुरी येथील बसेस सुरु आहे .आज बिडी झाली त्यामुळे बस आली नाही. उद्याला टीसी आहे व काही तांत्रिक कारणास्तव बस आली नसेल आम्ही विद्यार्थी फेरेवर लागलेली बस टाकली होती. तरी काही कारणास्तव बस लाखपुरी येत नसेल तर मी स्वतः लक्ष घालून प्रश्न निकाली काढणार – 

आबुलकर साहेब (आगार व्यवसथापक मुर्तिजापुर  )

गावात बस येत नसल्यामळे आम्हाला शाळेत पोचण्याकरिता वेळ होतो . विद्यार्थी , वुध्द ,अपंग , जेष्ठ नागरीक  , महिला वर्ग व  प्रवाशी वर्गांची गैर सोय होत आहे.

Post a Comment

0 Comments