Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर शहरात मुलींना छेडण्याचे प्रकार वाढले असल्याने रोडरोमीयोंचा बंदोबस्त करा - मनविसे तालुकाध्यक्ष जतिन सोनोने

दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी मंगरूळपीर शहरात मुलींना छेडण्याचे प्रकार वाढले असल्याने रोडरोमीयोंचा बंदोबस्त करण्याबाबत  मनसे विद्यार्थी सेना कडून मंगरूळपीर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना देण्यात आली निवेदन. या निवेदनात अशी नमूद करण्यात आली की मंगरूळपीर येथे महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये,  डी. एड. कॉलेज, संगणक संस्था आहेत. त्यामुळे शहरातील मुले-मुली तसेच ग्रामीण भागातील मुले-मुले/ विद्यार्थी हे शिक्षणासाठी येत असतात. परंतु सध्या मं. पीर शहरात रोडरोमियोंकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. शाळा, महाविद्यालय, कोचींग क्लास कडे जाणारे रस्त्यावरील चौकात, कॉलन्यामध्ये उनाड, रोडरोमियांचा वावर असतो.
हे लोक भरधाव वेगाने आपल्या मोटारसायकली मुलींजवळून घेऊन जातात तसेच छेड काढीत आहेत. अशा रोडरोमीयोंवर मंगरूळपीर पोलीसांचा कोणताही वचक नसल्यामुळे हे प्रकार वाढले असून मुली व त्यांच्या पालकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा येत आहे.  मंगरूळपीर शहरातील मुलींची छेड काढणारे रोडरोमियांच्या बंदोबस्तासाठी निर्भया पथक नियुक्ती करावी व छेडीचा प्रकार करणारे यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, उपजिल्हाध्यक्ष गजानन कळणे, मनसे तालुकाध्यक्ष लक्ष्मण जाधव, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष जतिन सोनोने ,  मुकुल ठाकरे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments