पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष शाम जगमोहन प्रजापती यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितले होती. त्यांच्यासोबतच माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे, यवतमाळचे डॉ. महेंद्र लोढा, भैयासाहेब मेटकर यांनीही उमेदवारी मागितल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. मात्र काँग्रेसने अनेक वर्षांपासून पक्षात असणाऱ्या उमेदवारांना डावलून बुलढाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील एक मोठा गट या निर्णयाने नाराज झाला आहे. काँग्रेसमध्ये आता अंतर्गत कलहाला सुरुवात झाली असून त्या कलहाचा उद्रेक श्याम प्रजापती यांच्या राजीनामे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा बुधवारी शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्याकडे पाठवला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी पदवीधरांचे प्रश्न आपण सर्वकश शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला.
का दिला राजीनामा?
काँग्रेस पक्षाकडे पक्षातील सहा जणांनी उमेदवारी मागितली होती. मात्र यातील काँग्रेसने कोणालाही उमेदवारी न देता बुलढाणा येथील धीरज लिंगाडे यांचे नाव अनपेक्षित पणे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसशी प्रामाणिक असलेला एक मोठा वर्ग पक्षाच्या या निर्णयावर नाखुश आहे. या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी असल्याचेही समोर येत आहे. याच निर्णयाचा परिणाम म्हणून श्याम प्रजापती यांनी आपल्या पदवीधर सेलचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
विचारांनी काँग्रेसमध्येच - प्रजापती
काँग्रेस पदवीधर सेलच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्षांनी तो राजीनामा स्वीकारावा अशी विनंती करण्यात आली आहे. केवळ पदाचा राजीनामा दिला असला तरी मनाने आणि विचाराने आपण काँग्रेसमध्ये आहोत अशी प्रतिक्रिया श्याम प्रजापती यांनी दिली आहे. लवकरच आपण सहयोगी संघटनांच्या मदतीने पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचेही प्रजापती यांनी म्हटले आहे.
0 Comments