Ticker

6/recent/ticker-posts

मुली हो स्वतःच्या संरक्षणासाठी समोर या. अश्विनीताई अवताडे

       
   दि.17,02/23 शुक्रवार रोजी  ग्राम वरुड येथे यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर मध्ये महिला सुरक्षा व आजची स्त्री या विषयावर मुलींना  जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनीताई राम अवताडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. अंजुम खान मॅडम, प्रमुख उपस्थिती डॉ. सय्यद रमीज सर, कार्यक्रमाधिकारी डॉ. चंद्रकांत उल्हे सर व सुषमा जाजु मॅडम उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना  अश्विनी ताईंनी मुलींना सांगितले की स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःच घ्या कोणावरी अवलंबून राहू नका जसं तुम्ही इतर क्लास लावतात तसंच कराटे क्लासचा पण प्रशिक्षण घ्या आणि आपल्या सुरक्षेसाठी जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी करा  आणि जीवनात एक ध्येय ठरवा ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा, हे सगळं करत असताना कितीही आमीषे व प्रलोभन आली तर त्याला बळी  पडु नका.  आपल्या आयुष्यासाठी काय योग्य काय अयोग्य या गोष्टीची जाण ठेवून आपल अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक मार्ग नीवडुन त्या मार्गाने चालत जावे. या मार्गात किती अडचणी आणि संकट आले तरी माघार घ्यायची नाही आपल्या नावा सोबत आई-वडिलांचं नाव करून आपले अस्तित्व तयार करायचे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आहेत पण बोटा वर मोजण्या इतक्याच बाकीच्या कुठे आहेत?  खूप महिला किंवा मुली  हुशार व कृत्ववान असतात आणि त्या एखाद्या चांगल्या कामाची कोणत्यातरी क्षेत्रात सुरुवात करतात  काही दिवसांनी ते काम काही कारणामुळे अर्ध्यात सोडून देतात, कारण त्यांच्या सोबत अशी एखादी घटना घडते की ते बाहेर जाणे सोडून देतात त्यामुळे कोणतेही काम करताना आपण कुठे फसले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी आणि आपली सुरक्षा कशी करता येईल या गोष्टीचा विचार करून कामे करावीत तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये त्यासाठी कोणतीही माहिती कुठेही शेअर करू नये जेणेकरून आपण फसल्या जाऊ नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपण कामे केली तर नक्कीच आपण  यशस्वी होऊ. असे यावेळी अश्विनीताईंनी सांगितले

Post a Comment

0 Comments