दुपारी १२:०० ते ०१:३० श्री. दहीहांडी व गोपाळकाला ह.भ.प. पांडुरंगजी गावंडे महाराज रा. शेलोडी यांचे मधूर वाणीतून तसेच श्री. संत योगिनाथ बाबा यांचे शुभ हस्ते होणार आहे. पालखी सोहळा मिरवणुकीमध्ये
श्री. शारदादेवी महिला वारकरी भजनी मंडळ रा. मसणी श्री. साईनाथ महिला भजनी मंडळ रा. येडशी गोपालकृष्ण महिला भजनी मंडळ रा. सोनखास, मंगरुळनाथ रेणुकामाता म हिला भजनी मंडळ रा शहापुर मंगरुळनाथ शारदा महिला भजनी मंडळ रा शहापुर, मंगरुळनाथ ही मंडळे सहभाग घेणार आहे. दि.१५/०२/२०२३ बूधवार ते १६/०२/२०२३ गुरुवार पर्यंत संध्या. ४ ते ७ संस्थानम् ध्ये विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. दि.१७/०२/२०२३ शुक्रवार सकाळी ११:०० वाजता मंदीरात चित्रऋषी वृध्दाश्रम मंगरुळनाथ येथील वृध्दांना ब्लॅकेट व साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यांचेसोबत मुकबधिर निवासी विद्यालय, तुळजापुर येथील विद्यार्थ्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. १७// २०२३ शूक्रवार सकाळी १०:०० वाजता वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजनाची भव्य खंजेरी भजन स्पर्धा संत श्री. अच्युत महाराज भजन स्पर्धा समिती मंगरुळनाथ कडून आयोजित केली असून जवळपास एक लक्षरु. चे वर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेकरीता श्री. बाळुभाऊ दिवेकर मंगरुळनाथ मोबा.नं. ८६०५०५००३६ यांचेशी संपर्क करावा. दि१९/ ०२/२०२३ रविवार उर्वरीत भजन स्पर्धेचा कार्यक्रम होणार आहे. कोरोनामुळे मागील २ वर्षे यात्रा न भरल्यामुळे यावर्षी यात्रेकरू व पंचकोशीतील भाविकांची विशेष आवड बघता खानपानाचे नविन प्रकारचे चविष्ठ पदार्थांच्या मेजवानीचे स्टॉल संस्थानने यावर्षी विशेष करून बोलाविलेले आहे. तसेच नेहमी महानगर पालिकेत लागणारे भोईराज अम्युझमेंट पार्क राजुभाऊ रमेश बावने यांना संस्थानने विनंती करून यात्रोत्सवाकरीता मनोरंजनाचे ज्वाइंट व्हिल ब्रेकडांन्स, टोराटोरा, ड्रेगन ट्रेन इत्यादी घेवून बोलाविले आहे. वरील आयोजित सर्व कार्यक्रमाकरीता संस्थानला दरवर्षीप्रमाणे सर्व भाविक भक्ता तथा नागरीकांचे सहकार्य लाभत असून संपूर्ण यात्रोत्सवातील धार्मीक सामाजीक तथा यात्रेम धील मनोरंजनाच्या साधनांचा नागरीकांनी शांततेत लाभ घ्यावा असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
सौ. गोगरकर यांनी साकारलेली रांगोळी
0 Comments