Ticker

6/recent/ticker-posts

गारपिटीने वाशिम जिल्हा पुन्हा हादरला

मंगरूळपीर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड वादळाचे तांडव, गारपिटीचे भीषण चित्र आज,  सायंकाळी दिसून आले. 
धुवाधार गारपीट  वाहनाचे ही नुकसान अवकाळी पाऊस झाला.
वादळी वाच्यामुळे पोलिस निवासस्थानावरील टिनपत्रे उडाले तसेच तीन ते चार ठिकाणी झाडेही उन्मळून पडली.
सुसाट गारपिटीमुळे MH 37 V.1748 गाडीच्या काचा फुटल्याची ही घटना घडली  सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वायासह धुवाधार गारपीट पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे शहरातील पोस्ट ऑफिससमोरील मुख्य
रस्त्यावर झाड कोसळले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय
परिसरातसुद्धा झाड कोसळले.
पोलिस वसाहतीमधील अधिकायांच्या निवासस्थानावरील टिनपत्रे उडाले व याच वसाहतीत झाडही कोसळले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे पपई, बिजवाई कांदा, टरबूज, आंबा, तीळ, निंबू तसेच भाजीपाला युग पिकांचे नुकसान झाले. सुसाट्याच्या वायामुळे वीजपुरवठा खंडित झाला. मागील महिन्यात तसेच या महिन्यातसुद्धा याआधी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन दिवसापासून पावसाचा गाराचा तांडव आता पुन्हा  अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकन्यांनी केली. दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने कडक उन्हाचे मानले जातात. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच अवकाळी पाऊस, वादळवारा आणि गारपीट असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसाच्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या तांडवाने  तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण भागात या वादळी वाऱ्याच्या गारपिटीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Post a Comment

0 Comments