Ticker

6/recent/ticker-posts

जी. एच. रायसोनी विद्यापीठात ‘काश्ती २०२६’ व्यवस्थापन स्पर्धा यशस्वी , देशभरातील १०५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


अमरावती : जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथील स्कूल ऑफध मॅनेजमेंट स्टडीजतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘काश्ती २०२६’ हा राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशभरातील विविध प्रतिष्ठित महाविद्यालये व संस्थांमधील १०५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.


कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी ‘उद्यम’ (बिझनेस प्लॅन), ‘अध्ययन’ (केस स्टडी) आणि ‘मंथन’ (ग्रुप डिस्कशन) या तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजकीय कल्पना, विश्लेषणात्मक क्षमता आणि संवाद कौशल्ये सादर करण्याची संधी मिळाली.


स्पर्धांचे निकाल 

उद्यम (बिझनेस प्लॅन) :
प्रथम – टीम ‘कॅपिटल क्रिएटर्स’ (सुमित अग्रवाल, देवर्षी ठाकरे, तेजस लिंगोट, ममता पारस्कर)
द्वितीय – टीम ‘एपेक्स ऑटोमेटर्स’ (अश्विन दहाके, आकांक्षा तेहरे, अशुतोष नंदाने, संयुक्ता तावळरे)

अध्ययन (केस स्टडी) :
प्रथम – आदित्य वानखेडे
द्वितीय – सोनाली खोब्रागडे

मंथन (ग्रुप डिस्कशन) :
प्रथम – आदित्य वानखेडे
द्वितीय – टीम ‘थिंक टँक’ (मयंक बुधवानी, वंशिका अग्रवाल, अलिया अब्दुल कुरी)

प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना रु. ५,००० तर उपविजेत्यांना रु. ३,००० अशी पारितोषिके देण्यात आली.

मुंबईतील विल्सन कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल (नागपूर), संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, विद्याभारती महाविद्यालय तसेच सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अमोल पांडे होते. त्यांना श्री. गुंजन चौधरी, श्रीमती प्रिया परढे, डॉ. पिंकी देवानी, श्री. अनिल कुमार आणि श्री. ध्रुव बाजपेयी यांनी सहकार्य केले.

हा कार्यक्रम कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल, डीन डॉ. प्रशांत अवचट आणि डॉ. राजकुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

‘काश्ती २०२६’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, विश्लेषण आणि नेतृत्वगुणांना चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


Post a Comment

0 Comments