प्रतिनिधी मोहम्मद फारुक खामगाव
दुपारी 12:00 वाजता पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला
खामगाव :- खामगाव कृषी उत्पन्न बाजाराच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा खिळल्या आहेत.आज दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल
खामगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली.बाहेर भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते मतदान केंद्रा बाहर दोघे आमने-सामने आले.यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला,त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जिल्हा परिषद हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती, दरम्यान, 12 वाजता काही काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने दोघांमध्ये वाद झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला
वयोवृद्ध महिला आणि पुरुष मतदानाच्या हक्कासाठी व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते
सर्व मतदान केंद्रांच्या मतपेट्या राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात जमा केल्यानंतर आजच सायंकाळी ६ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणी (मतमोजणी) सुरू होणार असून रात्री उशिरापर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
0 Comments