वाशिम,
: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीराच्या माध्यमातून मंगरुळपीर तालुक्यातील महिलांच्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. मंगरुळपीर येथील जुन्या पंचायत समितीच्या सभागृहात 23 मे रोजी या समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांकरीता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या योजनांची माहिती देणे, महिलांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करणे तसेच महिलांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीर घेण्यात येत आहे. शिबीरास मंगरुळपीर तालुक्यातील महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करुन घेण्याचे आवाहन मंगरुळपीरचे तहसिलदार, गटविकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
0 Comments