मंगरूळपीर :
मंगरूळपीर शहरा लगतच्या पंच शिल नगरातील पंचशिल बुद्ध विहाराला बुद्ध पोर्णिमा निमीत्त आज सकाळी ९ वाजता महावितरण चे संतोष मुंदे यांनी सौर उर्जेचा कंदील भेट दिला. अचानक पणे विज गेल्यावर अंधार होतो .त्यामुळे उजेडा साठी त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या पैशाने विकत आणून सौर उर्जेचा कंदील भेट देऊन एक प्रकारे समाजभान जपत समाज सेवा केली अशा निस्वार्थ समाज सेवेचा वसा असलेल्या कर्मचारी संतोष मुंदे यांचे उपस्थितांनी आभार मानत संतोष मुंदे सारखी दान पारमीतेचे भान सर्वानी जपावे असे या प्रसंगी विनोद डेरेअध्यक्ष पंचशिल बुद्धविहार यांनी आभार व्यक्त करतांना सांगीतले.
0 Comments