मंगरुळपीर - वाशिम जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष , जिल्हा परिषद अध्यक्ष तद्वतच मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजारसमिती अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन मंगरुळपीर बाजार समितीमध्ये भव्यदिव्य स्वरुपात करण्यात आले होते. वाशिम जिल्हाच नव्हे तर शेजारी जिल्ह्यातुनसुध्दा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जीवलगांची चहा त्यांची मदीयाळी याञेच्या स्वरुपात दिसुन आली. याप्रसंगी प्रत्येक पुष्पगुच्छासह , भेटवस्तु देऊन शुभेच्छा देत होते.
परंतु नांदखेडा ता. मंगरुळपीर येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग जायभाये यांनी भुईमुगाच्या शेंगा असलेल्या झाडालाच पुष्पगुच्छाचे स्वरुप देऊन आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या.
याबाबत उपस्थितांमध्ये कुतूहल दिसुन आले.
वेगळ्या शुभेच्छांद्दल पांडुरंग जायभाये यांची प्रतिक्रिया घेतली असता, नुकत्याच झालेल्या मंगरुळपीर बाजार समितीच्या निवडणूकी मध्ये चंद्रकांतदादा ठाकरे यांचे नेतृत्वात १००% यश मिळाले, अन् कार्यकर्यांच्या आग्रहास्तव ते बाजार समितीचे अध्यक्ष झाले. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व शेतकरी हित सदोदित त्यांचेकडुन व्हावे याच सदिच्छेने त्यांना भुईमुगाचे झाड पुष्पगुच्छाचे स्वरुपात दिल्याचे त्यांनी सांगितले .
0 Comments