समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या चालत असलेल्या जुगार अंडयांना पायबंद घालण्याकरिता जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात आली.
त्या अनुषंगाने दिनांक 03/06/2023 रोजी मा.सी.एम. कृतीका (भा.पो.से.) परीविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी कार्यालयीन स्टॉफ सह पो.स्टे. जऊळका हद्दीतील ग्राम कार्ली ता. जि. वाशिम येथे स्मशान भुमीचे बाजुला सार्वजनिक ठिकाणी पैसाचे हारजितवर चालणा-या जुगारावर रेड करुन 40790/- रु. चा मुददेमाल जप्त केला असून आरोपी 1. कैलास सखाराम सुळे, वय 42 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. कार्ली, ता. जि. वाशिम 2. ज्ञानेश्वर अर्जुना राऊत, वय 45 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. कार्ली, ता. जि. वाशिम 3. संतोष शंकर देशमुख, वय 42 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. कार्ली, ता. जि. वाशिम 4. भगवान प्रल्हाद आगळे, वय 61 वर्ष, रा. व्यवसाय मजुरी, रा. गोगरी ता. मंगरुळपीर जि. वाशिम 5. साहेबराव विठ्ठल इंगोले, वय 55 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. किनखेडा, ता. जि. वाशिम याचेवर पो.स्टे. जऊळका येथे महाराष्ट्र जुगार कायदया प्रमाणे गुन्हा नोंद करुन कार्यवाही केली आहे.
सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री. बच्चन सिंह (IPS) व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाने सी. एम. कृतीका (भा.पो.से.) परीविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक, वाशिम कार्यालयीन स्टॉप पोहेकॉ 1747, रविद्र कातखेडे पोकों / 351, इस्माईल कालीवाले, पोकों/05 रामेश्वर राऊत पोकों/88 मंगेश गादेकर, पो.कॉ. 1459 लक्ष्मण राऊत मपोकों/ 1398 रुपाली वाकोडे, मपोकों/ 1249 विदया राऊत, व उपविपोअ कार्यालय कारंजा येथील पोहेकॉ /953 फिरोज, पोहेकॉ / 165 विनायक देवघर पोका 712 वाळके, पो. कॉ. /1012 सोनीकर पो. कॉ./1411 गजानन यांनी पार पाडली.
मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी सर्व जनतेस सुजान नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती दयावी. त्या ईसमाचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल असे आव्हान केले आहे.
0 Comments