Ticker

6/recent/ticker-posts

“विकासासाठी जमीन, पण मोबदल्याला विलंब – शेतकऱ्यांचा संयम संपत चालला!” सौ. ज्योती ताई ठाकरे



प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संयम सुटण्याच्या मार्गावर!

सानुग्रह निधीच्या विलंबाविरोधात समाजसेविका ज्योती ताई ठाकरे यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

मंगरूळपीर | प्रतिनिधी

मंगरूळपीर तालुक्यातील विविध विकास प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारा सानुग्रह निधी अद्याप वितरित न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले आहेत. या निधीच्या वितरणात होत असलेल्या अनावश्यक विलंब, चालढकल आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप समाजसेविका सौ. ज्योती ताई मनोज ठाकरे यांनी केला आहे.

प्रकल्पासाठी जमीन दिल्यानंतरही शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून, मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च आणि दैनंदिन उपजीविकेसाठी त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळावा, या ठाम भूमिकेतून आज मंगरूळपीर येथील उपयोगी अधिकारी यांच्याशी सौ. ज्योती ताई ठाकरे यांनी सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, सानुग्रह निधीचे वितरण तातडीने न झाल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उघड पाठिंबा देण्यात येईल.

“शेतकऱ्यांनी विकासासाठी जमीन दिली, पण आज त्यांनाच दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने संवेदनशीलतेने या प्रश्नाकडे पाहून त्वरित निर्णय घ्यावा,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून विषयाबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्ष कृती कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या काळात हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




Post a Comment

0 Comments