Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा



४५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ग्राहक हक्कांवर सखोल मार्गदर्शन

मंगरूळपीर :
ग्राहक हक्कांविषयी जनजागृती व्हावी, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये सजग ग्राहक घडावा, या उद्देशाने मंगरूळपीर येथील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात तहसील कार्यालय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सुमारे ४५० विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी होते. तर अभय खेडकर (विदर्भ प्रांत संघटन मंत्री, अखिल भारतीय ग्राहक पंचायत) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल सुर्वे, ॲड. सुधीर घोडचर, अनिरुद्ध पांडे (उपविभागीय अभियंता, बीएसएनएल), संदीप पवार (आगार व्यवस्थापक, एस.टी.), निरंजन सातंगे (नायब तहसीलदार), संजय राठी (तालुका अध्यक्ष अ भा ग्रा पं,) राखी मंत्री (शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र), संदीप जयपूरकर (सहाय्यक अभियंता, महावितरण) व ॲड. संदीप भन्साळी (वाशीम जिल्हा विधी आयाम प्रमुख, अखिल भारतीय ग्राहक पंचायत) उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.


यावेळी ॲड. सुधीर घोडचर यांनी ग्राहक संरक्षण कायदा, फसवणूकग्रस्त ग्राहकांना मिळणारा कायदेशीर न्याय व तक्रार निवारण प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कोचिंग क्लासेसच्या फसव्या जाहिराती, निकालाची हमी देणारे दावे तसेच सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

पुरवठा निरीक्षक शिल्पा गाजले यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देत ग्राहक सजगतेचे महत्त्व अधोरेखित केले.
बीएसएनएलचे अभियंता अनिरुद्ध पांडे यांनी मोबाईल सिम घेताना आवश्यक असलेल्या केवायसी प्रक्रियेची माहिती देत ग्राहकांचे अधिकार तसेच हायस्पीड वायफाय सेवांबाबत मार्गदर्शन केले.
महावितरणचे संदीप जयपूरकर यांनी वीजपुरवठ्याबाबत अडचणी असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले.
एस.टी. आगार व्यवस्थापक संदीप पवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सेवा अधिक सक्षम असल्याचे सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या राखी मंत्री यांनी बँक ग्राहकांनी कोणत्याही फोन कॉलवर पॅनकार्ड, आधार क्रमांक, जन्मतारीख अथवा ओटीपी देऊ नये तसेच बनावट बँक अ‍ॅप्सपासून सावध राहावे, असा इशारा दिला.

ॲड. संदीप भन्साळी यांनी फसवणूक झाल्यास तात्काळ अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले.
प्रांत संघटक अभय खेडकर यांनी ग्राहक पंचायतची स्थापना, संस्थापक स्व. बिंदूमाधव जोशी यांचे कार्य व विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.


अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी ग्राहकांचे अधिकार, कर्तव्ये आणि ‘ग्राहक हा राजा आहे’ या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनंत शिंदे, तर सूत्रसंचालन प्रा. शरद कावरे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मंगरूळपीरचे गोपाल खिराडे, निलेश कदम, सुनील भुतडा, अनिल भन्साळी, अरविंद भगत, गणेश राऊत, विजय लोहिया, कन्हैया बजाज, लाला शर्मा, तसेच सौ. शीतल भन्साळी, सौ. माधुरी राठी, सौ. ज्योती भुतडा, सौ. ज्योती व्यवहारे, सौ. आरती मासोळकर, सौ. संगीता खिराडे, कु. संस्कृती व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाविद्यालयाच्या वतीने प्रा. महेश मनवर, प्रा. कु. धनजकर, प्रा. साहेबराव गावंडे, प्रा. जितेश सुर्वे, प्रा. अलोने, प्रा. आखरे, प्रा. कडू मॅडम, तसेच श्री पाखरे, श्री गायकवाड, श्री कंकाळ, श्री आवारे, श्री किशोर गावंडे, श्री विलासभाऊ गावंडे, श्री चंद्रकांत इंगळे, श्री संतोष ठोकळ, श्री अतुल भोयर, श्री रवि राठोड, चंद्रशेखर राठी यांनी सहकार्य केले.


तसेच पुरवठा निरीक्षक प्रफुल भगत, गोदामपाल अजय खिराडे, कनिष्ठ लिपिक गर्जे व जीवलग, संगणक परिचालक एजाज परसुवाले, रा.भा.दु. संघटना अध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष सुधाकर चौधरी, नीलेश पाटील व तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थ होते.

Post a Comment

0 Comments